एक्स्प्लोर

Nagpur News : नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपुरातील अनेक उड्डाणपूल बंद; कोणताही अपघात होऊ नये म्हणून निर्णय

Nagpur: पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nagpur News नागपूर: मकर संक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित  नायलॉन मांजा (Naylon Manja)  हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता नागपूर शहरातील (Nagpur City) अनेक उड्डाणपूल आज सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी 15 जानेवारीला दिवसभरासाठी शहरातील जवळ-जवळ सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील उड्डाणपूल दिवसभरासाठी बंद

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. दरवर्षी या पतंगबाजीच्या नादात अनेक हृदयद्रावक घटना घडत असतात. त्यातील सर्वाधिक घटनांमागे कारण हा नायलॉन मांजा ठरत आहे. या नायलॉन मांजाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. यासोबतच प्रशासनाला यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहे.

नागपूर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने शहरातील बहुतांश उड्डाणपूल आज 15 जानेवारीला दिवसभरासाठी बंद करण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजा उड्डाणपूलावर पडून तो वाहनचालकांच्या मध्ये येऊ शकतो, परिणामी त्यातून मोठा अपघात आणि  जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

आज बंद ठेवलेले उड्डाणपूल

शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुल पूल, सक्करदरा उड्डाणपूल, दिघोरी उड्डाणपूल, गोळीबार चौक-पाचपावली उड्डाणपूल, कडबी चौक पूल, कोकाकोला पूल, दहीबाजार-मेहंदीबाग पूल, मानकापूर, सदर उड्डाणपूल, मनिषनगर उड्डाणपूल.

नायलॉन मांजा टाळा, तक्रार करा

जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पोलीस विभागाने तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर विक्री आणि वापराबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. सोबतच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील पोलीस म्हणाले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget