एक्स्प्लोर

ही बातमी वाचून तुम्हाला वाटेल; पोलिसांनी आणखी काय करायला हंव?

बेवारस किंवा जे एकटेच राहतात, ज्यांचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात आहेत. लॉकडाऊनमुळे ते पोहचू शकत नाही, अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोण पुढे येईल असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसचं समोर आले आहेत.

नागपूर : खाकी वर्दीतली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत तर बेवारस मृतदेहांची गोष्टचं वेगळी. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार? या प्रश्नाला उत्तर म्हणून महाराष्ट्र पोलीस पुढे आले आहेत. बेवारस मृतदेहांवर किंवा ज्यांचे नातेवाईक परराज्यात अडकले आहेत आणि ते अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही, अशा मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस पुढे आले आहेत.

कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले पोलीस आपण पाहिलेच आहेत. मात्र, पडद्यामागे सुद्धा पोलिसांची सामाजिक बांधिलकीचं उदाहरण समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लोक एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. अशा परिस्थितीमध्ये बेवारस किंवा जे एकटेच राहतात आणि त्यांचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात आहेत. लॉकडाऊनमुळे ते पोहचू शकत नाही, अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोण पुढे येईल असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. याला उत्तर म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसच समोर आले आहेत.

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार मुंबई पोलीस दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा अशा मृतदेहांवर अंत्यविधीची जबाबदारी पार पाडली. वांद्रे पोलीस स्टेशन येथील रि. टा. गुप्ता यांनी 2005 मध्ये मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला आणि दोन मुलं पाण्यात बुडू लागली. रिटा गुप्ता यांनी मुलांचे प्राण वाचवले. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी याबद्दल रिटा गुप्ता यांना दिल्लीला बोलवून त्यांचा सत्कारही केला. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा रिटा गुप्ता जे आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. एक अशीच सामाजिक बांधिलकी जपत बेवारस मृतदेहांवर स्वतः अंत्यसंस्कार करून आपली जबाबदारी पार पाडली. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुण अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. इतकं होऊन सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावाला न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या संध्या सिल्वन्त यांनी आत्तापर्यंत सात बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

आनंदाची बातमी! जे. जे. पोलीस ठाण्यातील 45 पैकी 18 कर्मचारी कोरोनावर मात करुन कर्तव्यावर हजर

विरार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सुभाष शिंदे यांना 6 मे एक फोन आला की फुल पाडा येथील एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत. सुभाष शिंदे यांनी बिल्डिंगच्या सेक्रेटरीला बाहेर बोलावलं आणि जाऊन पाहणी केली. तर प्रमोद खारे नावाचे व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. बाहेरून पाहता शरीराची हालचाल होत नव्हती. त्यामुळे ते मृत्यू झाल्याचा संशय सुभाष शिंदे यांना आला. त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन पाहणी केल्यास प्रमोद खारे यांचा मृत्यू झाला होता.

प्रमोद खारे यांच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यावर त्यांनी मुंबईत येण्यासाठी अर्ज केले. मात्र, त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाही. आता अंत्यविधी कसा करणारा हा प्रश्न प्रमोद खारे यांच्या नातेवाईकांना समोर उपस्थित झाला. नातेवाइकांनी सुभाष शिंदे यांना विनंती केली की त्यांनी प्रमोद खारे यांचा अंत्यविधी करावा. सुभाष शिंदे यांनी माणुसकी जपत विनंती स्वीकारली आणि त्यांच्यावर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी केली. इतकच नाही तर कुटुंबातील लोकांना प्रमोद खारे यांचे दर्शन व्हावं यासाठी त्यांनी व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अंत्यविधी त्यांच्या घरच्यांना दाखवला. अंत्यविधीसाठी लागणारा खर्च सुद्धा सुभाष शिंदे यांनी स्वतःच्या खिशातून केला. त्याबदल्यात एक रुपयाही परत घेतला नाही.

Corona Fighters | जे.जे.पोलीस स्टेशनमधील 18 पोलीस कोरोनाला हरवून पुन्हा ड्युटीवर हजरा! Mumbai Police

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget