(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावचे जिल्हाधिकारी असा कसा आदेश काढू शकतात? अजित पवारांच्या संतापावर मुख्यमंत्री म्हणाले...
Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे संतप्त पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले.
Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे (Maharashtra Karnataka Border Dispute) संतप्त पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. खासदार तसेच महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar on Maharashtra Karnataka Border Dispute) संतप्त झाले. अजित पवार यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा समाचार घेत असा कसा आदेश काढू शकतात? अशी विचारणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून निवेदन दिले.
तत्पूर्वी, अजित पवार यांनी कर्नाटकच्या दडपशाहीवर (Maharashtra Karnataka Border Dispute) हल्लाबोल केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रविंद्र चव्हाण हे राज्याचे मंत्री आहेत.सभागृहात पक्षाच चिन्ह वापरणं योग्य नाही. सीमा प्रश्नावर अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, पेपरला अनेक बातम्या आल्या आहेत. माध्यमांमध्येही बातम्या झळकल्या आहेत. 6 डिसेंबरला दोन मंत्री कर्नाटकला जाणार होते. त्यानंतर कोणालाही जाण्यास येण्यास बंदी करायची नाही अस ठरलं होतं. मात्र, एका खासदाराला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कशी बंदी आणू शकतात? अशी दडपशाही योग्य नाही. सरकरने ठोस भूमिका घेतली पाहिजे.
अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची (CM Eknath Shinde on Maharashtra Karnataka Border Dispute) भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते यांनी जो मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्री यांच्या बैठकीत पहिल्यांदा केंद्राने हस्तक्षेप केला ही मोठी बाब आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी समज दिली आहे. मीडियासमोर केंद्र सरकारची भूमिका त्यांनी मांडली. याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. यापूर्वीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या आहेत. सीमावासिय ठराव करतात, यांच्या मागे कोण आहे याची माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे. छगन भुजबळ आणि आम्ही मार खालला आहे. त्यावेळी हे बाकीचे कुठे होते. शासन म्हणून आपण एकत्र उभं राहिले पाहिजे. कोणतंही राजकारण आणता कामा नये. राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत.
बेळगावला जाण्यासाठी कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी
दुसरीकडे, बेळगावात (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. तेथून मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या