(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat Election : नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चुरस, सव्वादोनशेहून अधिक ग्रामपंचायतींमधील 761 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात
नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Nagpur District Gram Panchayat Elections : राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (Gram Panchayat Election) पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) 236 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रमुख लढती...
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वडविरा या गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असून अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख हे दोन गट आमने-सामने आहेत.
- कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या धानला गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असून तेथे त्यांचा भाजप विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे तापेश्वर वैद्य या दोन गटांमध्ये लढत आहे.
- सावनेर तालुक्यातील केळवद ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसने 88 वर्ष सेवानिवृत्त शिक्षक यशवंत विंचुरकर यांना रिंगणात उतरवले आहे.
तालुका निहाय ग्रामपंचायत निवडणूक स्थिती
नरखेड तालुका
22 ग्रामपंचायत
सरपंच - 22,
सरपंच उमेदवार-67
सदस्य - 172,
सदस्य उमेदवार- 395
काटोल तालुका
27 ग्रामपंचायत
सरपंच- 27,
सरपंच उमेदवार-79
सदस्य - 199
सदस्य उमेदवार - 410
कळमेश्वर तालुका
23 ग्रामपंचायत
सरपंच- 23,
सरपंच उमेदवार-56
सदस्य - 189
सदस्य उमेदवार - 396
सावनेर तालुका
36 ग्रामपंचायत
सरपंच- 36,
सरपंच उमेदवार-17
सदस्य - 325
सदस्य उमेदवार - 794
पारशिवानी तालुका
21 ग्रामपंचायत
सरपंच- 21,
सरपंच उमेदवार-68
सदस्य - 177
सदस्य उमेदवार - 431
रामटेक तालुका
8 ग्रामपंचायत
सरपंच- 8,
सरपंच उमेदवार-35
सदस्य - 80
सदस्य उमेदवार - 221
मौदा तालुका
25 ग्रामपंचायत
सरपंच- 25,
सरपंच उमेदवार-87
सदस्य - 221
सदस्य उमेदवार - 557
कामठी तालुका
27 ग्रामपंचायत
सरपंच- 27,
सरपंच उमेदवार-90
सदस्य - 267
सदस्य उमेदवार - 621
नागपूर ग्रामीण तालुका
19 ग्रामपंचायत
सरपंच- 19,
सरपंच उमेदवार-56
सदस्य - 159
सदस्य उमेदवार - 404
हिंगना तालुका
7 ग्रामपंचायत
सरपंच- 7,
सरपंच उमेदवार-21
सदस्य - 69
सदस्य उमेदवार - 152
उमरेड तालुका
7 ग्रामपंचायत
सरपंच- 7,
सरपंच उमेदवार-29
सदस्य - 77
सदस्य उमेदवार - 225
कुही तालुका
4 ग्रामपंचायत
सरपंच- 4,
सरपंच उमेदवार-31
सदस्य - 40
सदस्य उमेदवार - 110
भिवापूर तालुका
10 ग्रामपंचायत
सरपंच- 10,
सरपंच उमेदवार-25
सदस्य - 76
सदस्य उमेदवार - 175
ही बातमी देखील वाचा