एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु, पहिल्याच दिवशी विरोधकांची तुफान घोषणाबाजी

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासह शेतकरी नुकसान आणि विविध विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु, पहिल्याच दिवशी विरोधकांची तुफान घोषणाबाजी

Background

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरात (Nagpur) सुरु झाली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

कसं असेल पहिल्या दिवसाचं कामकाज? 

  • सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील 
  •  महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश 2023 (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)
  •  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग) 
  •  महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023(गृहनिर्माण विभाग) 
  • सन 2023-24 च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. - शासकिय कामकाज 
  • त्यांनंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती 

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास  आजपासून  नागपुरात सुरुवात होणार आहे. आगामी निवडणुका (Lok Sabha Election 2024) डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. सत्ताधारी त्यांना कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्यात पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाणार आहे.  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांचा झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकार प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, फडणवीसांकडून त्यांना पान सुपारी 

विधामंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (7 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमीत्तानं सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये (Nagpur) पोहोचले आहेत. दरम्यान, काल (बुधवारी) चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार घातला. याबबातची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चहापानानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.

15:08 PM (IST)  •  07 Dec 2023

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 40 कोटींच्या निधीची तरतूद

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 40 कोटींच्या निधीची तरतूद. आज मांडण्यात आलेल्या पुरवण्या मागण्यांमध्ये तरतूद. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधीची तरतूद ठेवल्याचा विरोधकांचा आक्षेप

14:27 PM (IST)  •  07 Dec 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधावर, अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील शेतीच्या नुकसानीची पाहणी

12:30 PM (IST)  •  07 Dec 2023

Devendra Fadnavis on Nawab Malik : देशद्रोहाच्या आरोपानंतरही नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही? : फडणवीस

ज्यावेळी  नवाब मलिकांवर देशद्रोहाचे अरोप झाले त्यावेळी यांनी ते जेलमध्ये असताना देखील राजीनामा घेतला नव्हता. आणि विरोधक म्हणत आहेत आता आम्ही मांडीला मांडी लावून बसलो असे म्हणता. तर त्यांनी लक्षात घ्यावं माझ्याशेजारी मांडीला मांडी लावून अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले आहेत. त्यामुळे विरोधकांनी आमची काळजी करु नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

11:49 AM (IST)  •  07 Dec 2023

जितेंद्र आव्हाडांचे आरोप म्हणजे चोराच्या मनात चांदणं : अमोल मिटकरी

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर कागदपत्रांच्या चोरीचे गंभीर आरोप लावले ते सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे मत अजित पवार गटाचे विधान परिषदेचे प्रतोत अमोल मिटकरी म्हणाले. सत्तेत जाण्याच्या ठरावावर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या सह्या आहेत. त्यामुळे चोरांच्या मनात चांदणं दिसत असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी आज  सहपरिवार विधिमंडळ परिसरात पोहचले. त्यावेळी त्यांचा तीन वर्षाचा मुलगा हा एकच वादा अजित दादा चा जयघोष करतांना पाहायाला मिळाला. 

11:28 AM (IST)  •  07 Dec 2023

Bharat Gogawale on Disha Salian case:  दूध का दूध पाणी का पाणी होईल : भरत गोगावले  

जर चूक असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. चुकी नसेल तर घाबरण्याचं काम नाही, असं म्हणते शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंच्या एसआयटी चौकशीवर भाष्य केलं. सुनील प्रभू आता अवसान आणल्या सारखे बोलतोय. विरोधकांकडे राहिले काय आहे त्यांनी आता जय महाराष्ट्र करावा..तीन राज्यात काय झालं आपण पाहिले आहे, असं भरत गोगावले म्हणाले.   

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget