एक्स्प्लोर

संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणं बंद, डॉ. निलम गोऱ्हेंची माहिती

नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद केलं आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Assembly Session : संसदेचं (Parliament Winter Session 2023) कामकाज सुरु असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद केलं आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे  यांची सभागृहात माहिती यांनी दिली. 

विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार

विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे. 

संसदेत नेमकं काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना सुरक्षेत मोठी (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत (Lok Sabha) हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे (Color Spray) असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली.  लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आल्याची माहिती एका खासदाराने दिली आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीनं गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले.

आंदोलकांना घेतलं ताब्यात, एक जण लातूरचा

एक जण महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील (Delhi) संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं. 

महत्त्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी : लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक, अज्ञाताची प्रेक्षक गॅलरीतून उडी, स्मोक कँडल जाळल्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget