एक्स्प्लोर
Advertisement
मध्य प्रदेश-छत्तीसगडच्या सत्ताकेंद्राशी गोंदियाचं खास नातं!
गोंदियातील मसानी कुटुंबाचे जावई असलेले शिवराज सिंह चौहान तेव्हा अनेक कौटुंबीक कार्यक्रमांसाठी गोंदियाला यायचे. आता याला योगायोग म्हणा किंवा गोंदियाच्या लोकांचे अच्छे दिन... जेव्हा 15 वर्षांच्या सत्तेनंतर शिवराजसिंह चौहान सत्तेतून पायउतार झाले, त्याचवेळी गोंदियाचे मेहुणे असलेले भूपेश बघेल शेजारील छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्री म्हणून सत्तेत दाखल होत आहेत.
गोंदिया : राज्याच्या नकाशावर एका कोपऱ्यात असलेला गोंदिया जिल्हा. हा जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचं केंद्र कधी होईल माहित नाही, पण शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांसोबत गोंदियाचं वेगळंच नातं आहे. या दोन्ही राज्यातील सत्तेच्या सर्वोच्च स्थानी गोंदियाचा जावई तरी असतो किंवा मेहुणा तरी...
मध्य प्रदेशात 15 वर्ष एकहाती सत्ता राखणारे शिवराज सिंह चौहान गोंदियाचे जावई आहेत. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत शिवराज पायउतार झाले पण त्याचवेळी गोंदियाचे मेहुणे असलेले भूपेश बघेल शेजारील छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्री झाले. गोंदियाने शेजारील राज्यातील सत्तेत आपला सहभाग कायम ठेवला आहे.
प्राचीन काळी राजकीय स्थिती भक्कम करण्यासाठी राजघराण्यांमध्ये रोटी-बेटी व्यवहाराची परंपरा होती. शेजारील राज्यांशी संबंध बळकट करण्यासाठी अनेक राजघराणे शेजारील राज्यात कौटुंबीक नाते जोडायचे. आधुनिक काळात तशीच स्थिती गोंदियाची म्हणावी लागेल.
गोंदियातील मसानी कुटुंबाचे जावई असलेले शिवराज सिंह चौहान तेव्हा अनेक कौटुंबीक कार्यक्रमांसाठी गोंदियाला यायचे. आता याला योगायोग म्हणा किंवा गोंदियाच्या लोकांचे अच्छे दिन... जेव्हा 15 वर्षांच्या सत्तेनंतर शिवराजसिंह चौहान सत्तेतून पायउतार झाले, त्याचवेळी गोंदियाचे मेहुणे असलेले भूपेश बघेल शेजारील छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्री म्हणून सत्तेत दाखल होत आहेत.
गोंदियाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या दयाळ राईकवार यांचे भूपेश बघेल सख्खे मेहुणे आहेत. 1985 साली बघेल कुटुंबातील मीरा या यांचा विवाह गोंदियातील राईकवार कुटुंबात झाला होता. गेलं दीड दशक गोंदिया आणि मुख्यमंत्री पदाचं नातं कायम असून भूपेश बघेल यांच्या स्वरुपात ते पुढेही घट्ट होत राहील, अशी प्रतिक्रिया भूपेश बघेल यांचे जिजाजी दयाळ राईकवार यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील रमण सिंह यांच्या सरकारमध्ये सतत 15 वर्ष सर्वात वरिष्ठ मंत्री राहिलेले ब्रिजमोहन अग्रवालही गोंदियाचे जावई आहेत. ते गोंदियाच्या दादरीवाल कुटुंबीयांचे जावई आहेत. तर मध्य प्रदेशात अनेक वर्ष शिक्षण मंत्री राहिलेले कृष्णकुमार गुप्ता हे गोंदियाच्याच मोदी कुटुंबीयांचे जावई आहेत.
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या गौरीशंकर बिसेन यांची सासुरवाडीही गोंदियाच्या बोरगावची आहे. तर मध्य प्रदेशातील बालाघाटचे खासदार बोधचिन्ह भगत हे गोंदियाच्या कुडावा परिसरातील बिसेन कुटुंबाचे जावई आहेत. त्यामुळे गेली अनेक दशके गोंदियाने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सत्ता केंद्रात असलेले नाते कायम ठेवले आहे.
गोंदियाचे खासदार असलेले प्रफुल्ल पटेल यूपीए सरकारच्या काळात सतत दहा वर्ष केंद्रात मंत्री होते. त्यांच्यानंतर गोंदियाच्या लोकप्रतिनिधींच्या वाट्याला सत्तेतील मोठी पदे आलेली नाही. मात्र गोंदियाच्या जावई आणि मेहुण्याच्या निमित्ताने शेजारील राज्यात सत्तेची शिखरे गोंदियाकरांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडली गेली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement