झाडावर बसलेल्या माकडावर बिबट्याचा हल्ला, एक चूक अन् माकड्याचा खेळ खल्लास! खतरनाक व्हिडीओ व्हायरल
Leopard Attack : झाडावर बसलेल्या एका माकडाची क्षणासाठी नजर चुकली आणि क्षणात विद्युत वेगाने बिबटने झाडावर चढत त्याची शिकार केल्याचा हा व्हिडीओ आहे.
नागपूर : जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षण मोठा संघर्ष करावा लागतो, थोडीशी बेफिकरीही त्याच्या जीवावर बेतते. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ (Leopard Hunting Video) समोर आला आहे. बिबट्याने झाडावर चढून माकडाची शिकार (Monkey Hunting) केल्याची ही घटना पेंचच्या जंगलात सफारीसाठी आलेल्या पर्यटकांसमोरच घडली. याचा व्हिडीओ मुंबईतील चिन्मय सालये या पर्यटकाने कॅमेऱ्यात चित्रित केलाय. महाराष्ट्राच्या सीमेलगत पेंच व्याघ्र (Pench Tiger Reserve) प्रकल्पातील तुरिया गेटजवळ जंगलात शिकारीची (Leopard Attack) थरारक घटना घडली.
शिकारी आपल्या जवळ असल्याचे माहित असूनही झाडावर बसलेल्या एका माकडाची क्षणासाठी नजर चुकली आणि क्षणात विद्युत वेगाने बिबटने झाडावर चढत त्याची शिकार केल्याचा हा व्हिडीओ आहे. शिकार केल्याची ही घटना पेंचच्या जंगलात सफारीसाठी आलेल्या पर्यटकांसमोरच घडली. आणि त्याचा व्हिडिओ मुंबईकर पर्यटक चिन्मय सालये या पर्यटकाने कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेट जवळ ही जंगलातील शिकारीची थरारक घटना घडली आहे.
कशी झाली माकडाची शिकार?
बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्यानं माकडाची शिकार केली. आश्चर्याची बाब म्हणजे ही शिकार बिबट्याने माकडाची शिकारी केवळ 5 सेकंदात त्याची शिकार केली. बिबट्याचा हा वेग पाहता कोणी म्हणेल नजर हटी दुर्घटना घटी... पर्यटकांना काही कळण्याअगोदरच बिबट्याने माकडाची शिकार केली होते. पण माकडाने न अशी कुठली चूक केली ज्यामुळे त्याची शिकार झाली? हे पाहूया.
पाहा व्हिडीओ :
शिकारीची अंगावर काटा आणणारी घटना
जंगलात वाघ आणि बिबट्या यांचा आसपास वावर असेल तर त्याची सर्वात आधी चाहूल माकडांना लागते. मग ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणजे ते इतर माकडांना कॉलिंग करून अलर्ट करतात. या घटनेतील माकड ही तसाच अलर्ट देत असल्याचे आपण या व्हिडीओत ऐकू शकतो. झाडावर बसून माकडांचे बिबट हा शिकारी जवळ असल्याचे कॉलिंग सुरू होते. मात्र सुमारे 70 ते 80 मीटर उंचावर बसलेल्या एका माकडाला शिकार करण्यासाठी बिबटने अचूक हेरले. त्या माकडाची नजर थोडीशी हटली. काही करण्याअगोदर दबा धरून असलेल्या बिबटने झेप घेतली आणि क्षणात झाडावर चढून त्या माकडाची शिकार केली. जंगलातील शिकारीची अंगावर काटा आणणारी ही घटना सफारीवर आलेल्या पर्यटकांसमोरच घडली.
हे ही वाचा :