एक्स्प्लोर

Nagpur News : युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा जोरदार झटका, न्यायाधीशांनी तातडीने रुग्णालयात केलं दाखल, मात्र...

Nagpur News : नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. यानंतर न्यायाधीशांनी वकिलांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

नागपूर : कोरोना काळापासून हृदयविकाराच्या धक्क्यामुळे (Heart Attack) मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शनिवारी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करणाऱ्या वकिलाचा (Lawyer) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला झाला आहे. यामुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी (Talat Iqbal Qureshi) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार (S B Pawar) यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

युक्तिवाद सुरू असताना हृदयविकाराचा झटका

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वकील तलत इक्बाल कुरैशी शनिवारी सकाळी जिल्हा न्यायालयात पोहोचले. सातव्या मजल्यावर असलेल्या वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश एस. बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांची उलटतपासणी झाली. आपली प्राथमिक उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर कुरैशी यांनी कोर्टाला दाखले देऊन ते आपल्या बेंचवर बसले. यानंतर विरोधी पक्षाचे वकील आपली बाजू मांडत असताना कुरैशी अचानक बेंचवरून खाली कोसळले. 

डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित

यावेळी न्यायाधीश पवार ताबडतोब त्यांच्या जागेवरून खाली आले आणि त्यांना पाणी पाजले. यानंतर न्यायाधीशांनी वेळ न दडवता बकील तलत कुरैशी यांना त्यांच्या खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तलत कुरैशी यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. त्यांच्या पश्चात दोन्ही विवाहित मुली आहेत. या घटनेमुळे न्यायालयात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी 

दरम्यान, जिल्हा न्यायालय संकुलात दररोज सुमारे आठ हजार वकील कामकाजासाठी येतात. तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.  दररोज 30 ते 40 हजार नागरिक खटल्यांसाठी कोर्टात येतात. त्यामुळे कोर्टात रुग्णवाहिका व प्राथमिक उपचाराची सुविधा असावी. शासनाने येथे प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डीबीएचे माजी अध्यक्ष कमल सतुजा यांनी केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : क्रुरतेचा कळस.. सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

मुंबईच्या एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget