एक्स्प्लोर

... तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवलं जाईल; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

रोज सकाळी 10 वाजता मुंबईत घराबाहेर येऊन खोट बोलतात, आज गोबेल्स असता तर त्यानेही आत्महत्या केली असती. अदृश्य शक्तींनी पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास दूर कराव्या लागतील

मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यातच, एकीकडे महायुतीसोबत असलेल्या आमदार रवि राणा यांनी लाडक्या बहि‍णींना उद्देशून भाषण करताना मला आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून 1500 रुपये काढून घेईल, असे गमतीने म्हटले होते. आता, त्यावरुन मंत्रिमंडळ बैठकतही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुनावले. तर, दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनीही नाव न घेता आमदार रवि राणांना (Ravi rana) सुनावलं आहे. आता, मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर दिली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याचं त्यांनी म्हटलं.   

नागपूरमधील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना, महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले.  आपल्याकडून मित्र पक्ष दुखावलं जाईल असे कृत्य कोणीही करु नये. आज जोगेंद्र कवाडे, महादेव जानकर बैठकीत नसले तरी सर्व पक्षाचा सन्मान करू, कोणी कोणाला कमी समजू नका, महायुतीत स्वतः बाहेर राहून दुसऱ्यासाठी औषध मागू नये, असा सल्लाही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच, लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. 

रोज सकाळी 10 वाजता मुंबईत घराबाहेर येऊन खोट बोलतात, आज गोबेल्स असता तर त्यानेही आत्महत्या केली असती. जबाबदारीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, अदृश्य शक्तींनी पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास दूर कराव्या लागतील. विरोधक सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात, तुमच्या खोटं बोलण्यामुळे सरडासुद्धा आत्महत्या करेल, असे म्हणत सामंत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांच्या टीकेवरुन पलटवार केला आहे. तसेच, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल, असेही सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रचाराचा मुद्दा बनत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करू, असे म्हटले आहे. 

विरोधक विकासावर बोलत नाहीत

काँग्रेस आग लावत आहे हे सांगण्याची जवाबदारी आपली आहे, महामानव डॉ. बाबासाहेब यांना निवडणुकीत पराभूत करणारे कोण (काँग्रेस) होते, हे संगण्याची जवाबदारी आपली आहे. काँग्रेस जळतं घर आहे, मला पक्षानं काय दिल हे पाहण्याची वेळ नाही, मी पक्षाला काय दिले हे सांगण्याची वेळ आहे. विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं तर याला तुरुंगात टाकू,पण विकासाची एक गोष्ट न सांगता बदला घेण्याची भावना बोलून दाखवतात, असेही सामंत यांनी म्हटले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPhaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणाGovernment Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून  20 लाख करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...
अजित पवारांची स्मार्ट खेळी, भरसभेत फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी, रामराजेंचा मूड बदलला
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Embed widget