सीमाप्रश्नाबाबत उद्या विधीमंडळात ठराव आणणार, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत तर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन (Karnataka Maharashtra Border Dispute) विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Assembly Session) वातावरण तापलं आहे.
Maharashtra-Karnatak Issue Updates: कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन (Karnataka Maharashtra Border Dispute) विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Assembly Session) वातावरण तापलं आहे. कर्नाटकनं त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी (Maharashtra News) ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली. यानंतर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाईल.
दिल्लीत मुख्यमंत्री म्हणाले, सीमावासियांसाठी आम्ही खंबीर, उद्या ठराव आणणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय 60 वर्षांपासूनचा आहे. असं असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असंही ते म्हणाले.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंच इंच जागेचा विचार करु, तसूभरही मागे हटणार नाही
दरम्यान कर्नाटक विरोधात उद्या किंवा आज ठराव आणणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की, आपण इंच इंच जागेचा विचार करु. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकारसमोर आपण सीमावर्ती भागातील नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जे करायचं असेल ते करु. आपलं ठराव आणण्याचं ठरलं होतं. आज तो ठराव आपण मांडला होता. मुख्यमंत्री आज दिल्लीला केंद्राच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यामुळं ते आज जर आले तर आज किंवा उद्या हा ठराव आपण मांडू. यासंदर्भात आपण तसूभरही मागे हटणार नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही बातमी देखील वाचा