एक्स्प्लोर

MNS Nagpur : जय भोलेश्वर गोविंदा पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, भंडारा येथील एक गोविंदा पथक, तर दोन महिला पथक ठरले आकर्षणाचे केंद्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण - पश्चिम  विधानसभातर्फे सोनेगाव परिसरातील सहकार नगर गजानन महाराज मंदिरा जवळ असलेल्या मैदानात दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नागपूरः दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध सार्वजनिक आयोजनांवर ब्रेक लागला होत. मात्र यंदा निर्बंधमुक्त असल्याने शहरातील विविध भागात विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्यावतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण - पश्चिम  विधानसभातर्फे सोनेगाव परिसरातील सहकार नगर गजानन महाराज मंदिरा जवळ असलेल्या मैदानात दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या दहीहंडीत नागपुरातील सहा बलाढ्य गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदविला, भंडारा जिल्ह्यातील एक गोविंदा पथक तसेच दोन महिला गोविंदा पथकांचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच 75 हजारांचे प्रथम पुरस्काराचा मान नागपुरातील जय भोलेश्वर गोविंदा पथकाने मिळवला. यावेळी पोलिसआयुक्त अमितेश कुमार, एबीपी नेटवर्कच्या विदर्भ संपादक सरीता कौशिक, माजी रणजी क्रिकेटपटू हेमंत वसू, मनोहर अगस्ती, डॉ. अनुप मरार, ज्येष्ठ नागरिक वसंत पाटील आदी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके, तुषार गिऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी गोविंदा पथके आणि उपस्थित नागरिकांची मनसे दक्षता समितीतर्फे काळजी घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आयोजन केल्याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. ढोलताशांच्या व डिजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी यामुळे उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाचे संचालन पूनम खंडवानी यांनी केले. चौथ्या फेरीत सहा थरांवर असलेल्या दहीहंडीला फोडण्यात यश मिळविले. या विजयाचा मान नागपुरातील जय भोलेश्वर गोविंदा पथकाने मिळविला.  

मनसेतर्फे प्रथम पारितोषिक 75,000 रुपये  व मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी चमूला 5000  रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक व मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य दिल्याबद्दल सोनेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांचे मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी आभार मानले. आयोजनासाठी तुषार गिऱ्हे, चेतन शिराळकर, चेतन बोरकुटे, शिरीष पटवर्धन, हर्षद दसरे, राजू पोलाखरे, विपीन धोटे, देवेंद्र ठाकरे, जमशेद अन्सारी, रोशन इंगळे, गणेश मुदलीयार, प्रसन्ना पटवर्धन ,मिलिंद जोशी, संजय करमचदाणी यांनी परीश्रम घेतले.

इतर बातम्या

NMC News : सोशल मीडियावर नागरिकांच्या तक्रारी जोमात, मनपा प्रशासन कोमात; एबीपी माझाच्या प्रश्नांवर मनपा प्रशासक राधाकृष्णन यांच्याकडून 'नो रिस्पॉन्स'

Nagpur municipal corporation elections 2022 : नागपूर महानगरपालिकेची 15 वर्षांपासून भाजपच्या हाती सुत्रे, जाणून घ्या इतिहास

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप

व्हिडीओ

Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Embed widget