एक्स्प्लोर

हिट अँड रनच्या घटनेनं नागपूर पुन्हा हादरलं; भरधाव बसनं सायकलवरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडलं, घटना CCTV मध्ये कैद

Nagpur Crime : नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसनं धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली.

Nagpur Hit And Run : नागपूर : गेल्या काही दिवसांत हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यभरातील हिट अँड रनच्या घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. मुंबईतील वरळी हिट अँड रनच्या (Worli Hit And Run Accident) घटनेनंतर नागपुरातील (Nagpur) अशाच एका घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागपुरात सायकलवरुन जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला भरधाव बसनं धडक दिली. या घटनेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसनं धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली. बस भरधाव असल्यामुळे सायकलवरुन पडलेली वृद्ध व्यक्ती बसच्या चाकाखाली आली. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. पोलिसांना सदर बसची ओळख पटली असून बसचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

नागपुरात आता 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या दोन घटना

गेल्या 24 तासांत हिट अँड रनच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हिट अँड रनची घटना घडली. तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं आहे. दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर फरार झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर - कोराडी मार्गावर भीषण अपघात

नागपूर - कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भरधाव वेगानं येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली. त्यानंतर अनियंत्रित होऊन स्विफ्ट कार पलटी झाली.  

पाहा व्हिडीओ : Nagpur Gittikhadan : नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या दोन घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget