एक्स्प्लोर

चार महिन्यात पैसे दुप्पट! बारावी पास तरुणाचा देशभरातील 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना 100 कोटींचा चुना

लॉकडाउनच्या काळात जिथे चांगल्या चांगल्या व्यावसायिकांच्या धक्का बसला. तिथे बारावी उत्तीर्ण तरुणाने देशभरात 25 हजारपेक्षा जास्त लोकांना श्रीमंतीची खोटी स्वप्ने दाखवत शंभर कोटींचा चूना लावला आहे. सूटबूट घालून नेहमीच चकचकीत राहणाऱ्या विजय गुरनुले या भामट्याला पोलसांनी बेड्या ठोकल्या आहे.

नागपूर : लॉकडाउनच्या काळात एका बाजूला चांगल्या चांगल्या व्यावसायिकांच्या व्यवसायांना धक्का बसला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्याचवेळी अवघ्या बारावी उत्तीर्ण तरुणाने महाराष्ट्रासह देशभरातील 25 हजारपेक्षा जास्त लोकांना श्रीमंतीचे स्वप्ने दाखवत शंभर कोटींचा चूना लावला आहे. सूटबूट घालून नेहमीच चकचकीत राहणाऱ्या विजय गुरनुले नावाच्या या भामट्याला पोलसांनी बेड्या ठोकल्या आहे.

रियल ट्रेड घोटाळा प्रकरणी विजय गुरनुलेसह दहा आरोपीना अटक करूनही पोलीस आतापर्यंत फक्त एक कोटींची रक्कम हस्तगत करू शकले आहेत. त्यामुळे "झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये" हे एका चित्रपटातले डायलॉग या भामट्याने वास्तवात उतरवून दाखविला आहे.

विजय गुरनुले हा मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सीएमडी आहे. मात्र, या महाभागाने व्यवसायात काही चांगलं करण्याऐवजी लॉकडाऊनच्या काळात 25 हजारपेक्षा जास्त सामान्य कुटुंबाना शंभर कोटींचा चूना लावला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हजारो कुटुंबाना देशोधडीला लावणारा हा भामटा फक्त बारावी उत्तीर्ण आहे.

लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वांचे व्यवसाय अडचणीत आले होते, नोकऱ्या जात होत्या. लोकांच्या उत्पन्नात कमालीची घट होत होती. तेव्हा विजय गुरनुलेच्या मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने "रियल ट्रेड" नावाची योजना लोकांच्या घशात उतरविली. लोकांच्या खिशातून एक दोन नाही तर तब्ब्ल शंभर कोटींची गुंतवणूक काढून घेतली. मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडिया ही कंपनी 2015 पासूनच अस्तित्वात आहे. अनेक व्यवसायात हात आजमावणाऱ्या या कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये रियल ट्रेड नावाने गुंतवणुकीची योजना आणली. या योजनेत वार्षिक किंवा मासिक नव्हे, तर दर आठवड्याला परतावा दिला जाईल, असे विजय गुरनुलेने जाहीर केले.

काय होती रियल ट्रेड योजना?

  • गुंतवणूकदाराने ठराविक रक्कम गुंतविल्यास त्याला निश्चित रकमेचा परतावा दर आठवड्याला मिळेल.
  • दर आठवड्याला परतवा मिळत असल्याने गुंतवलेली रक्कम 3 ते 4 महिन्यात दुप्पट होईल.

रियल ट्रेड योजनेत 7 उपप्रकार होते.

  • 9 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 750 परतावा
  • 21 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 2250 परतावा
  • 33 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 3185 परतावा
  • 45 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 5250 परतावा
  • 57 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 6750 परतावा
  • 67 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 9500 परतावा
  • 93 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 12500 परतावा

या शिवाय मल्टी लेव्हल मार्केटिंग प्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने आणखी गुंतवणूकदार आणले तर त्याला कमिशन मिळणार होतं.

कोरोना काळात लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यात लोकांना उत्पन्नाचे नवे साधन हवे आहे. त्यांना घर बसल्या गुंतवणुकीची झटपट श्रीमंत करणारी आकर्षक योजना सांगितली, तर लोकं त्याकडे सहज आकर्षित होतील हे गुरनुले आणि त्याच्या टीमने ओळखले. छोट्या छोट्या समूहात लोकांच्या व्हर्चुल मिटींग्स घेत रियल ट्रेड योजनेची माहिती सांगितली. आधीच काम धंदे ठप्प झालेले लोक मोठ्या संख्येने या योजनेकडे आकर्षित झाले.

जास्त गुंतवणूकदार आणणाऱ्यांचे मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडियाच्या कार्यालयात सत्कार केले जाऊ लागले. त्यांचे फोटो व्हायरल केले जाऊ लागले. पाहता पाहता कंपनीला 25 हजार प्राथमिक गुंतवणूकदार मिळाले. या 25 हजार गुंतवणूकदारांनी जवळपास अडीच लाख आयडी ओपन करत शंभर कोटींची गुंतवणूक गुरनुलेच्या कंपनीत गुंतविली. एप्रिलपासून जूनपर्यंत तर लोकांना दर आठवड्याला परतावे मिळाले. त्यानंतर अडचणी येऊ लागल्या. ऑगस्टपासून परतावे पूर्णपणे बंद झाले. दिवाळीच्या काळात तर कंपनीच्या कार्यालयावर कुलूप ठोकून विजय गुरनुले आणि त्याचे साथीदार पसार झाले.

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार या कंपनीने आपलं मायाजाल संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विणले होते. व्हर्च्युअल मिटींग्स, त्यात आकर्षक आश्वासने, ज्यांना सुरुवातीच्या आठवड्यात परतावे मिळाले त्यांच्याकडून होणारी माऊथ पब्लिसिटीद्वारे गुरनुलेचं मायाजाल पसरत गेलं. फसवणूक झालेल्यापैकी सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील असून त्यांनतर आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बंगाल, उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांचा समावेश आहे. रियल ट्रेड योजनेचे शिकार झालेल्यांमध्ये बेरोजगार तरुण, नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, घरघुती बचत गुंतविणाऱ्या महिला यांच्यासह आर्किटेक्ट, वकील, डॉक्टरांसारखे प्रोफेशनल्स यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणी मेट्रो व्हिसन बिल्डकॉन इंडियाचा मुख्य प्रोमोटर विजय गुरनुलेसह दहा जणांना अटक केली आहे. गुरनुलेच्या नातेवाईकांच्या घरातून 56 लाख तर कंपनीच्या संचालकांच्या विविध बँक अकाउंट मधून 48 लाख अशी सुमारे एक कोटीची रक्कम पोलिसांनी जप्त केली असली तरी गोठल्याची व्याप्ती पाहता जप्तीचा आकडा अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रयत्न वाढवण्याची गरज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
Embed widget