(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naxals clash : गडचिरोलीत पोलिसांसोबतच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार
घटनास्थळी पोलिसांकडून शोधमोहिम सुरु, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी मोठी चकमक झाली. या चकमकित 13 नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. या कारवाईमुळं गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही घटना घडलीय गडचिरोली पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. त्यातच भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, खात्मा करण्यात आलेल्या नक्षवाद्यांची संख्या वाढू शकते. अद्यापही या भागात शोधमोहिम आणि सुरु असून हा संपूर्ण भाग छत्तीसगढच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पण, सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवलं होतं. या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे.
सध्याचा काळ हा तेंदू पत्ता संकलनाचा काळ आहे. या संपूर्ण भागाची अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. त्यामुळं याला नेमकी किंमत द्यायची याकडे शासनाचा भाग असला तरीही सत्यपरिस्थिती हीच आहे कि नक्षलवादीच या किमती ठरवतात. याच किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसून, त्यांनी ही कारवाई केली.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 मे 2021 | शुक्रवार | ABP Majha
सदर बैठकीला गावकरी, कंत्राटदारांच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती असते. याच आधारे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांना यश आहे. सध्याच्या घडीला मारल्या गोलेल्या 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अनेकदा नक्षलवादी काही मृतदेह सोबत नेतात, पोलिसांना त्यांच्या वाट्याला आलेल्या यशाची चाहूल लागू न देण्यासाठी असं केलं जातं. या कारवाईत याचीच पुनरावृत्तीही झाल्याचा अंदाज आहे.