एक्स्प्लोर
नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलाव परिसरात भीषण आग, हजारो झाडं जळली
काल मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास या परिसरातून आगीचे लोळ उठताना दिसले. स्थानिक नागरिकांनी वन विकास महामंडळासह अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली.
नागपूर : नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावाचा बॅक वॉटर परिसर आणि वन विकास महामंडळाने केलेल्या मोठ्या प्रमाणात केलेल्या वृक्षारोपणाच्या जागेवर काल मध्यरात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने मध्यरात्री 2 वाजल्यापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी आणि वाडी परिसराच्या दरम्यान वन विकास महामंडळाची सुमारे 2 हजार एकर एवढी विस्तीर्ण जागा आहे. या मोठ्या परिसरात गेल्या काही वर्षात नैसर्गिकरित्या झुडपी जंगल वाढले आहे. तसेच राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरु केल्यानंतर ही गेल्या तीन वर्षात याच जमिनीवर हजारो रोपटे लावून मानवनिर्मित जंगल निर्माण करण्याची आली होती.
मात्र, काल मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास या परिसरातून आगीचे लोळ उठताना दिसले. स्थानिक नागरिकांनी वन विकास महामंडळासह अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. मात्र, वन विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी 2 तासांपर्यंत पोहोचूच शकले नाही.
अखेर 2 वाजल्यापासून अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले. मात्र, तोवर वन मंत्री मुंनगंटीवारांच्या स्वप्नातील वृक्षारोपण केलेली हजारो रोपटी भस्मसात झाली. शिवाय अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरात वावरणारे शेकडो पक्षी आणि छोटे प्राणी यांचे देखील जीव गेले आहे.
दरम्यान ही आग मानवी चुकांमुळे लागली की जाणूनबुजून घातपात करून लावण्यात आली या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. 2 हजार एकरांच्या या विस्तीर्ण परिसराचा भविष्यात कसा वापर करावा यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींना तिथे पर्यटनाच्या दृष्टीने एखादे प्रकल्प हवे आहेत. तर काहींना हे परिसर निसर्ग निरीक्षण आणि पक्षी निरीक्षणासाठी मोकळे ठेवावे असे वाटत आहे. त्यामुळे आगीचे संबंध याच वेगवेगळ्या मतप्रवाहात तर नाही ना अशी शंका या घटनेनंतर निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement