Falcon 2000 जेट्स आता 'मेड इन नागपूर', डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार, पहिल्यांदाच फ्रान्सबाहेर निर्मिती
Falcon 2000 Business Jets : फाल्कन 2000 बिझनेस जेट्सची नागपुरात निर्मिती होणार असून महाराष्ट्र आता अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझीलच्या यादीत सामील झाला आहे.

मुंबई : फ्रान्सच्या फाल्कन 2000 जेट्सची निर्मिती आता नागपुरात होणार असून त्यासंबंधी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्समध्ये करार करण्यात आला आहे. पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात हा ऐतिहासिक करार झाला आहे. फ्रान्सच्या बाहेर अशा प्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे.
नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही यामुळे मोठा बुस्ट मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे.
पहिले मेड इन इंडिया फाल्कन नागपुरात
भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन 2000 ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन 8 एक्स आणि 6 एक्स ची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन 2028 पर्यंत नागपुरात तयार होईल.
एरोस्पेस भविष्यासाठी अभिमानास्पद टप्पा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "नागपूर आणि महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! फाल्कन 2000 बिझनेस जेट्स आता 'मेड इन नागपूर' असणार आहेत. डसॉल्ट एव्हिएशन प्रथमच फ्रान्सबाहेर, भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी फाल्कन 2000 जेट्सची निर्मिती करणार आहे. या ऐतिहासिक उत्पादनासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्ट्रक्चर भागीदार आहेत. कॉर्पोरेट आणि लष्करी वापरासाठी 2028 पर्यंत पहिली डिलिव्हरी करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर पुढील पिढीतील बिझनेस जेट्स वितरित करण्यात महाराष्ट्र अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझीलच्या यादीत सामील झाला आहे. भारताच्या एरोस्पेस भविष्यासाठी हा एक अभिमानास्पद टप्पा आहे."
Huge News for Nagpur & Maharashtra! Falcon 2000 Business Jets will now be ‘Made In Nagpur’! Dassault aviation to manufacture Falcon 2000 Jets for the first time outside France, for Indian & Global markets. Dassault Aviation & Reliance Aerostructure partner for this historic… pic.twitter.com/F00h8Epf5D
— IANS (@ians_india) June 18, 2025
डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणार्या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी 10 हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे 90 देशांना त्याचा पुरवठा केला जातो.
ही बातमी वाचा:
























