Nagpur : पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा, 1962 या टोल फ्री क्रमांका वर साधा संपर्क
1962 या क्रमांकावर फोन करुन त्यावर सेवा विनंती नोंदविल्यानंतर, आयुक्तालयातील मध्यवर्ती कॉल सेंटरद्वार नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था किंवा नजीकच्या फिरत्या पशुचिकित्सालयाकडे अग्रेषित करण्यात येते.
नागपूर : नागपुरातील पशुपालकांनी शासनाच्या घरपोच पशुरुग्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी केले आहे. यासाठी केंद्रीय टोल फ्रि क्रमांकही सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेंतर्गत 73 फिरत्या पशुचिकित्सा पथके पशुपालकांच्या दारात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजना कार्यान्वित केली आहेत.
फिरत्या पशुचिकित्सा पथकांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार 73 तालुक्यामध्ये करण्यात आलेला असून पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी केले आहे. यानुषंगाने 1962 या टोल फ्रि क्रमांकावर गरजू पशुपालकांनी दुरध्वनी करुन त्यावर सेवा विनंती नोंदविल्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयात स्थापित करण्यात आलेल्या मध्यवर्ती कॉल सेंटरद्वार संबंधित विनंती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था किंवा नजीकच्या फिरत्या पशुचिकित्सालयाकडे अग्रेषित केली जाते व संबंधितद्वारे पशुरुग्णांवर उपचार करण्यात येतात. उपचारासाठी विहित कालमर्यादाही रोगलक्षणानूसार निश्चित करण्यात आले आहे.
या कार्यपध्दतीनूसार योजना चालू झाल्यापासून 29 जून अखेरच्या कालावधीत फिरत्या पशुवैद्यकीय दावाखान्याद्वारे प्राप्त झालेल्या दुरध्वनीचे विवरणानूसार सेवाचा लाभ घेणाऱ्या पशुपालकांच्या संख्येमध्ये घट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर फिरते पशुवैद्यकीय पथके कार्यरत असलेल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना 1962 या टोल फ्रि क्रमांकाबाबत माहिती देवून पशुपालकांना या योजनेविषयी अवगत करावे. पशुपालकांसाठी घरपोच सेवा मिळण्यासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेस पशुपालकांनी प्रतिसाद द्यावा, आवाहन पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
Pune : शेतकऱ्यांना कारखाने पैसे देणार तरी कधी? साखर आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी संघटनेचे बोट
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पत्त्यात बदल
नागपूर : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर या कार्यालयाच्या पत्त्यात बदल झाला असून सदर कार्यालय हे भुविकास बँक कॉम्प्लेक्स, गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर, नागपूर-440032 या ठिकाणी स्थानांतरीत झाले आहे. सदर कार्यालयाशी करावयाचा पत्रव्यवहार नविन पत्त्यावर करावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केला आहे.