एक्स्प्लोर

NMC Elections : अंतिम मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार

अंतिम मतदार यादीत प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 52611 मतदारांची नोंद आहे. तर 50 हजारांवर मतदार असलेले दुसरे प्रभाग क्रमांक 50 ठरले. तरप्रभाग क्रमांक 22 मध्ये 49084 मतदार आहेत.

नागपूरः महापालिकेच्या प्रभागाची अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. विविध प्रभागातून आलेले 519 आक्षेप निकाली काढत प्रारुप मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सायंकाळी दहाही झोन कार्यालयांत 52 प्रभागाची अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींची मोठी संख्या असल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी दोनदा मुदतवाढ दिली होती. गुरुवारी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार आहेत.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. निवडणूक आयोगाने सुरुवातीला 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांतर 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर 21 जुलै अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस ठरविला. त्यामुळे अनेकांमध्ये प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीबाबत उत्सुकता होती. अखेर महापालिकेने गुरूवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करीत इच्छुक, माजी नगरसेवकांना दिलासा दिला. त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुक व माजी नगरसेवकांना प्रभागातील मतदारांचा अभ्यास करून पुढील डावपेच आखता येणार आहे. शहरात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर 519 नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदविण्यात आले होते. हे सर्व आक्षेप निकाली काढत महापालिकेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.

संकेतस्थळावरही यादी उपलब्ध

महापालिकेने गुरुवारी अंतिम मतदार यादी झोन कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली. परंतु 52 प्रभागांची मतदार यादी अपलोड करण्याकरिता विलंब लागणार असल्याने उद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मनपा निवडणूक अधिकारी व सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी नमुद केले.

प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक मतदार

अंतिम मतदार यादीत प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 52611 मतदारांची नोंद आहे. तर 50 हजारांवर मतदार असलेले दुसरे प्रभाग क्रमांक 50 ठरले. तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये 49084 मतदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Karad Crime: इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
Garud Puran : मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...
मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Embed widget