एक्स्प्लोर

Rashtriya Vayoshri Yojana : नागपुरातील 9 हजार दिव्यांग व ज्येष्ठांना गुरुवारी वैद्यकीय सहाय्यक साधनांचे वितरण

दिव्यांग, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. सध्या हा उपक्रम केवळ दक्षिण नागपुरात आयोजित करण्यात आला असून पुढे इतर विधानसभा क्षेत्रातही आयोजित करण्यात येतील.

नागपूर : दक्षिण नागपुरातील 9018 लाभार्थ्यांना (अडीप - 854, वयोश्री- 8164) एकूण 68,683 साहित्य, उपकरणे (अडीप- 1731, वयोश्री- 66952) वितरित करण्यात येणार आहेत. नागपूर शहरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. गुरुवारी 25 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता दक्षिण नागपूरमधील लाभार्थ्यांना रेशीमबाग मैदानात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहेत. अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, भारती कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) चे महाव्यवस्थापक अजित चौधरी, समाज विकास विभाग उपायुक्त विजय हुमणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे आदी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील 35,136 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे यांना रु. 35 कोटीचे 2,34,781 उपकरण वितरीत केले जाणार आहे.

9 हजार  18 लाभार्थ्यांना वितरण

गुरुवारी फक्त दक्षिण नागपुरातील 9018 लाभार्थ्यांना (अडीप - 854, वयोश्री- 8164) एकूण 68,683 साहित्य, उपकरणे (अडीप- 1731, वयोश्री- 66952) वितरित करण्यात येणार आहेत. या उपकरणांचा एकूण खर्च 9.19 कोटी एवढा खर्च आहे. तसेच इतर लाभार्थ्यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रनिहाय उपकरणाचे वितरण केले जाणार आहे. याची अगाऊ सूचना नागरिकांना देण्यात येईल. 

दक्षिण नागपुरातील लाभार्थ्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील आमदारांसह महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी श्री. विपीन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. सहाय्यक साधने वितरणाला दुपारी 2.30 वाजता सुरुवात होईल. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे.

Nagpur : मूक-बधीर मुलाला सहा वर्षानंतर केले बिहारमधील पालकांच्या स्वाधीन, रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळला होता सोचनकुमार

या उपकरणांचे वितरण

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणेः वॉकिंग स्टिक, श्रवण यंत्र, एल्बो कक्रचेस, व्हीलचेअर, ट्रायपॉड्स, क्वॅडपॉड, कृत्रिम मर्डेचर्स, स्पेक्टल्स, क्वॅकपॉड, स्पेक्टल्स, एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी पुढील उपकरणेः  वॉकिंग स्टिक, एल्बो कक्रचेस, एझलरी कक्रचेस (कुबडे), कृत्रिम अवयव, श्रवण यंत्र, ट्रायपॉड्स
क्वैडपोड, व्हीलचेयर, ट्रायसिकल (मॅन्युअल), ट्रायसिकल (बॅटरी), कॅलीपस, TLM कीट, ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता), स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता), डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता), स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता) या उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे.

Olympiad Exam : ऑलिम्पियाड परीक्षा 15 सप्टेंबर पासून, नागपुरातील एक लाखांवर विद्यार्थी होणार सहभागी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget