एक्स्प्लोर

Nagpur News : आपत्तीचा सामना करण्यास ‘आपदा मित्र’; जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांची निवड

आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना तसेच आपत्तीदरम्यान करण्यात येणारे प्राथमिक व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण नागपूर जिल्ह्यातील निवड झालेल्या 500 स्वयंसेवकांना शिबीरात देण्यात येणार आहे.

Nagpur News : नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी आणि सामना करण्यासाठी 'आपदा मित्र' उपक्रम राबवण्यात येत असून नागपूर जिल्ह्यातील पाचशे स्वयंसेवकांची निवड यासाठी करण्यात आली आहे. या अंतर्गत 14 तालुक्यातील स्वयंसेवकांची निवड या निवासी शिबीरासाठी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन बीएसएनएलचे (BSNL) महाव्यवस्थापक यश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 12 दिवसीय हे निवासी प्रशिक्षण शिबीर असणार आहे. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना तसेच आपत्तीदरम्यान करण्यात येणारे प्राथमिक व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक यश पालेकर म्हणाले की, कुठलीही आपत्ती ही सांगून येत नाही. ती अचानक येते. त्यामुळे या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. कुठल्याही आपत्तीनंतरचा सुरुवातीचा प्रतिसाद हा महत्वपूर्ण असतो. त्याला आपण कसा प्रतिसाद देतो यावर पुढील अनर्थ अवलंबून असतो.

प्रशासन सज्ज

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे म्हणाले की, आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्यही आपत्तीच्या वेळी प्रशासनाला मिळण्याची गरज आहे. रेस्क्यू, रिलिफ आणि रिहॅबिलिटेशन हे तीन 'आर' आपत्तीचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले.  

'आपदा मित्र' कार्यक्रमाविषयी…

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा 'आपदा मित्र' कार्यक्रम राज्य शासनामार्फत राबवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याकरता 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधून एकूण 500 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयावर 12 दिवसाकरीता निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 500 स्वयंसेवकांची विभागणी 5 बॅचेस मध्ये करण्यात येणार आणि प्रत्येक बॅचमध्ये 100 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. 12 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना, आपदा मित्राची आपती व्यवस्थापनामध्ये भूमिका, शोध आणि बचावकार्य, प्रथमोपचार आणि समूदाय मूल्यांकन, सर्पदंश संरक्षण आदी माहिती यादरम्यान दिली जाणार आहे.

ही बातमी देखील वाचा...

Nagpur News : दररोज कारवाई, लाखोंचा मांजा जप्त, तरीही शहरात पुन्हा नायलॉन मांजा येतो कुठून?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget