नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसमुक्त झालेल्या व्यक्तीवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी 14 दिवसांच्या उपचारानंतर या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र या व्यक्तीला आता पुन्हा क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

नागपूर : कोरोनापासून मुक्त झालेल्या व्यक्तीवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या या व्यक्तीवर केवळ गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांनी त्याला सक्तीने पुन्हा क्वॉरंटाईन केलं आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातील या व्यक्तीला कोरोना झाल्याचं निदान 4 एप्रिलला झालं होतं. टेलरचा व्यवसाय करणारी ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी दिल्लीहून परत आली होती. व्यवसायानिमित्त दिल्लीला गेल्याचं त्याने सांगितलं होते. कोरोना व्हायरसची (कोविड 19) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या व्यक्तीवर गेले 14 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान नियमानुसार केलेल्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यावर शुक्रवारी रात्री त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित; वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात हॉटस्पॉट
मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरही हा व्यक्ती परिसरात फिरायला लागला. सोबतच सोशल मीडियावर उलट-सुलट व्हिडीओ आणि मेसेच पोस्ट करू लागल्याने नागपूरच्या तहसील पोलिसांनी त्याच्यावर कलम 188, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुन्हा 14 दिवसाच्या क्वॉरंटाईनमध्ये दाखल केलं आहे.
नागपुरात महापालिका क्षेत्रात आज तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 वर पोहोचला आहे. आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू नागपुरात झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोरोना व्हारसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
- देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित : आरोग्य मंत्रालय
- Lockdown | देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू
- 'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
