केंद्र सरकारचा 25000 कोटी रुपयांचा गेम चेंजर प्लॅन, जगाच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू अधिराज्य गाजवरणार
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार 2025 ते 2031 पर्यंत निर्यातदारांना सुमारे 25000 कोटी रुपयांची मदत देण्याची योजना विचारात घेत आहे.
Business News : जगभरातील देशांमध्ये भारतीय उत्पादने पोहोचवण्यासाठी सरकार एक नवीन योजना आखत आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार 2025 ते 2031 पर्यंत निर्यातदारांना सुमारे 25000 कोटी रुपयांची मदत देण्याची योजना विचारात घेत आहे. या योजनेनुसार, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या रकमा खर्च केल्या जाणार आहेत. या मोहिमेचे उद्दिष्ट पुढील 6 वर्षांत मोठ्या प्रमाणात, समावेशक आणि शाश्वत निर्यात वाढीला चालना देणे आहे.
मुख्य उद्देश निर्यातदारांना स्वस्त आणि सुलभ कर्जे देणे
या मदतीचा मुख्य उद्देश निर्यातदारांना स्वस्त आणि सुलभ कर्जे देणे आहे. वाणिज्य मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च वित्त समिती (EFC) कडे पाठवला आहे. जर तो मंजूर झाला तर तो भारतीय निर्यातदारांना विशेषतः अमेरिकेच्या करांमुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करेल. ईएफसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर, वाणिज्य मंत्रालय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेईल. या मोहिमेचे उद्दिष्ट पुढील 6 वर्षांत (आर्थिक वर्ष 2025-2031) मोठ्या प्रमाणात, समावेशक आणि शाश्वत निर्यात वाढीला चालना देणे आहे. याअंतर्गत, पारंपारिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) ज्या प्रमुख समस्यांना तोंड देतात त्यावर उपाय शोधले जातील. सूत्रांनी सांगितले की, दोन उप-योजनांद्वारे हे अभियान राबविण्याची योजना आहे.
निर्यात प्रोत्साहन (10000 कोटी रुपयांपेक्षा जास्त)
निर्यात दिशा (14500 कोटी रुपयांपेक्षा जास्त)
कुठे खर्च होणार पैसे?
निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकार ज्या गोष्टींचा विचार करत आहे, त्यामध्ये पुढील 6 वर्षांसाठी 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज अनुदान समर्थन समाविष्ट आहे. याशिवाय, पर्यायी व्यापार वित्त पर्यायांना प्रोत्साहन देणे, ई-कॉमर्स निर्यातदारांसाठी क्रेडिट कार्ड प्रदान करणे आणि रोख प्रवाहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी इतर आर्थिक व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. निर्यात दिशा योजनेअंतर्गत प्रस्तावांमध्ये निर्यात गुणवत्ता मानकांचे पालन करण्यासाठी समर्थन सुमारे 4000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील, परदेशी बाजारपेठ विकासासाठी 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च तसेच निर्यातीसाठी ब्रँडिंग, गोदाम आणि लॉजिस्टिक्स आणि जागतिक मूल्य साखळीत अधिकाधिक भारतीय उद्योगांना एकत्रित करण्यासाठी क्षमता निर्माण यांचा समावेश आहे. यामध्यमातून निर्यातदारांना स्वस्त आणि सुलभ कर्जे देण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Made in India Microchip : PM मोदींची मोठी घोषणा, वर्षअखेरीस पहिली मेड इन इंडिया मायक्रोचिप बाजारात येणार, नेमकी काय असते मायक्रोचिप?
महत्त्वाच्या बातम्या






















