दीड वर्षाच्या मुलीला शेजाऱ्याने घरी नेले, आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
Delhi Crime : लहान मुलीला शेजाऱ्याने खेळण्यासाठी घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी त्या नराधमास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नवी दिल्ली: देशभरात महिला आणि बालिकांच्यावर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. असाच एक खळबळजनक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. दिल्लीच्या बिजवासन गावात दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्या मुलीच्या घराच्या शेजाऱ्याने हा गुन्हा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराबाबत कापशेरा पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीच्या आईने सांगितले की सकाळी नऊ वाजता तिचा शेजारी सुधीर उर्फ बिट्टू तिच्या दीड वर्षाच्या मुलीला त्याच्या खोलीत घेऊन गेला.
आरोपी दारूच्या नशेत होता
मुलीच्या आईने पुढे सांगितले की, काही वेळाने मुलीच्या रडण्याचा आवाज आतून ऐकू आला. दरवाजा आतून बंद होता आणि तो उघडताच मुलगी रक्ताने माखलेली आढळली. 32 वर्षीय आरोपी सुधीर उर्फ बिट्टू दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेतच त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं.
आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले. पीडितेला तिच्या आईसह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
A PCR call was received at PS Kapashera regarding sexual assault on a minor girl at Village Bijwasan. On reaching the spot, it was found that tenant S (mother of the victim, aged 24 years) reported that around 09:00 AM, her neighbour and co-tenant Sudhir @ Bittu took her 1.5… pic.twitter.com/qODQ5WvWsv
— IANS (@ians_india) August 24, 2025
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांच्या निवेदनानुसार, घटनास्थळी गुन्हे पथकाला बोलावण्यात आले आणि आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले. आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:
























