एक्स्प्लोर

Lockdown | देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीनं 3 मे नंतर काही ठराविक डॉमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : देशातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर या काळात रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबद्दलही चर्चा सुरु आहे. त्यात आज एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीनं 3 मे नंतर काही ठराविक डॉमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया वेबसाईटच्या होमपेजवर असा मेसेज आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सेवेचंही चित्र स्पष्ट होतंय. कारण आंतराराष्ट्रीय विमानसेवेसाठीचं बुकिंग 31 मे पर्यंत बंद करण्यात आलं आहे. आणि 1 जून नंतरच्याच प्रवासासाठी बुकिंग सुरु आहे. अर्थात वेळोवेळी स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असंही यात म्हटलं आहे.

एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे, त्यामुळे एअर इंडिया पाठोपाठ आता खासगी विमान सेवाही अशाच पद्धतीनं बुकिंग सुरु करतात का याची उत्सुकता आहे. देशात सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 20 एप्रिलनंतर देशातल्या काही भागात मात्र थोड्या सवलती मिळणार आहेत. कृषी क्षेत्र, ग्रामीण भागातले उद्योग यांच्यासाठी या सवलती असणार आहेत. त्यासाठीच्या गाईडलाईन्सही सरकारनं जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विमानसेवेबाबत 3 मे नंतरची स्थिती काय असते हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे.

'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा  

देशातील कोरोना संसर्ग होण्याचा वेग मंदावला सर्वांसाठी सकारात्मक बातमी आली आहे. देशात कोरोना संसर्ग होण्याचा वेग मंदावला आहे. 14 हजार 792 लोकांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी 2014 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. म्हणजे एकूण रुग्णांपैकी 13.85 टक्के रुग्ण बरे झालेत. तर काल 991 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिमाणी अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी कोरोना प्रभाव कमी आहे, अशा ठिकाणी काही अटींवर उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते.

Business Plan After Lockdown | लॉकडाऊननंतर उद्योग-व्यापारातील तोटा कसा भरून काढायचा? विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचा कानमंत्र!

महत्त्वाच्या बातम्या

Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
CJP विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार, देशभर वकिलांची फौज एकत्र करणार, कपिल सिब्बल यांच्याकडून कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी
सीजेपी विद्यार्थी आंदोलकांसाठी वकिलांचं देशव्यापी नेटवर्क उभारणार, कपिल सिब्बल यांच्याकडून एक कोटींचा निधी जाहीर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget