एक्स्प्लोर

Nitin Gadkari : "शरद पवार म्हणजे जपानी बाहुली"; नितीन गडकरींचा शरद पवारांवर घणाघात

Nitin Gadkari : नागपुरातील एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Nitin Gadkari on Sharad Pawar : 'शरद पवार (Sharad Pawar) हे म्हणजे जपानी गुडिया प्रत्येकाला वाटतं की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नागपूरमध्ये (Nagpur)  भाजपच्या (BJP) नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील उपस्थित होते. 

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

'जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवारांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळते', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला देखील दिला आहे. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, 'थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्ट.' वर्स्ट'पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की,  'आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही.' पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो अशी मिश्लिक टीप्पणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 

अरविंद गजबिये यांना दिला सल्ला 

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अरविंद गजबिये यांना देखील सल्ला दिला आहे. अरविंद गजबिये तुमचं काम बावनकुळे नक्की करतील असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तर पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'बावनकुळे यांनी तुमचं काम केलं तरी भलं नाही केलं तरी भलं.' पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत राहा, त्याचा आनंद घेत राहा. असा सल्ला नितीन गडकरी यांनी अरविंद गजबिये यांना दिला आहे. 

नितीन गडकरींना शरद पवारांच्या बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून गडकरींच्या या टीकेला काही उत्तर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर शरद पवार काही भाष्य करणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दावे - प्रतिदाव्यांच सत्र सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

विरोधकांना पाठिंबा की पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर हजेरी? शरद पवारांच्या भूमिकेवर खिळल्यात सर्वांच्या नजरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget