(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : धावत्या रेल्वेतून सराफा व्यापाऱ्याचे 52 लाखांचे दागिने चोरी, अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील प्रकार
सराफा व्यापाऱ्याने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मात्र, चोरीची ही घटना कुठे घडली याविषयी त्यांना सुद्धा कुठे घडली याविषयी त्यांना सुद्धा माहिती नाही.
नागपूरः रेल्वेमध्ये प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी स्वतः घ्यावी असे प्रशासन नेहमीच सांगते. मात्र कितीही काळजी घेतली तरी चोरट्यांकडून आपल्या वस्तूंवर डल्ला मारण्यात येतोच, अशीच एक घटना अमृतसरच्या एका सराफा व्यापाऱ्यासोबत (jewellery businessman) घडली. त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये (Amritsar To Nagpur Train)पहाटे उघडकीस आली.
लखविंदरसिंग (वय 49) यांचे अमृतसह येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे. विविध प्रकारच्या डिझाईनचे (designer jewelry) ते दागिने तयार करून महानगरातील सराफा व्यापाऱ्यांना मागणीप्रमाणे तयार करुन पुरवठा करतात. याच श्रृंखलेत नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या ऑर्डर प्रमाणे विविध डिझाईनचे दागिने तयार करून ते नागपूरकडे निघाले. मोठ्या प्रमाणावर दागिने असल्याने सोबत त्यांचा मुलगाही होता.
बॅग तपासल्यावर बसला धक्का
अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या बी-2 डब्यातून ते प्रवास करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या बॅगमध्ये दागिने असलेली छोटी बॅग होती. गाडी पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Junction railway station) आली. सराफा व्यापारी फलाटावर उतरल्यानंतर सर्व प्रथम त्यांनी बॅग तपासली, मात्र, बॅगमध्ये छोटी बॅग नव्हतीच. घामाघूम झालेल्या सराफा व्यापाऱ्याने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मात्र, चोरीची ही घटना कुठे घडली याविषयी त्यांना सुद्धा कुठे घडली याविषयी त्यांना सुद्धा माहिती नाही.
सुरुवातीपासून होती पाळत?
चोरांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोहमार्ग पोलिस अमृतसह रेल्वे स्थानकासह इतरही स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. गुन्हे शाखेसह लोहमार्ग पोलिसांचे दोन पथक अमृतसरला रवाना झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे आरोपींना हुडकून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Hemant Soren : झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; भाजपचा सभात्याग
नदीच्या पुरात युवक गेला वाहून
नागपूरः रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथकी भरून वाहू लागले. अशातच नगरधन -चिचाळा मार्गावर असलेल्या सांड नदीलाही मोठा पूर आला. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असताना या पुलावरून पायी जाणाऱ्या एका 32 वर्षीय युवकाच्या मात्र जीवावर बेतले. पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव संजय नागोराव नागपुरे (वय 32, चिचाळा) असे आहे. तो नगरधनवरुन चिचाळा या त्याच्या गावी पायी जात होता.