एक्स्प्लोर
रिक्षा चालकांची पोलिसांना वर्दी फाडून मारहाण
नागपूर शहरातील गणेशपेठ बसस्थानकासमोर रिक्षा चालकांनी (ऑटो रिक्षा चालकांनी) दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूर : शहरातील गणेशपेठ बसस्थानकासमोर रिक्षा चालकांनी (ऑटो रिक्षा चालकांनी) दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना माराहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ एबीपी माझाला मिळाला आहे. प्रकाश सोनवणे आणि किशोर धपके असी मारहाण झालेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मयुर राजूरकर आणि सोनू कांबळे या दोन आरोपी ऑटो चालकांना अटक केली आहे.
गणेशपेठ बसस्थानकासमोर प्रचंड वाहतूक असते. शिवाय बस स्थानकातून निघणाऱ्या किंवा बाहेर गावाहून येणाऱ्या शेकडो एसटी बसेस याच मार्गातून ये जा करतात. परंतु, ऑटोसह अनेक अनधिकृत वाहने या परिसरात उभी केलेली असतात. त्यामुळे बुधवारी वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर धपके आणि प्रकाश सोनवणे यांनी राहुल डिलक्स हॉटेलसमोर चालान व जामरची कारवाई सुरू केली होती.
कारवाई सुरु असताना वाहतूक कर्मचाऱ्यांशी ऑटो चालक मयुर राजुरकर व सोनू कांबळे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातूनच त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश सोनावणे व किशोर धपकेंना मारहाण केली. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची वर्दीदेखील फाडली. या दोघांनी धपके यांना जबर मारहाण केली.
दरम्यान या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी दोन आरोपी ऑटो चालकांना अटक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वीही गणेशपेठ परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी एका वाहनचालक युवकाने पोलिसावर हल्ला करण्याची घटना संविधान चौकात घडली होती.
VIDEO : पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement