RTMNU : नागपूर विद्यापीठाचे वरातीमागून घोडे; दोन महिन्यांनंतर पाठविला नवा अभ्यासक्रम
विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असताना नवा अभ्यासक्रम (syllabus changed) पाठवून त्यानुसार शिकविण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंद मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेशाची प्रक्रिया संपून बराच कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असताना नवा अभ्यासक्रम (syllabus changed) पाठवून त्यानुसार शिकविण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे महाविद्यालये हैराण झाली असून विद्यापीठाचे वरातीमागून घोडे येत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विद्यापीठाद्वारे यंदा महाविद्यालयस्तरावर प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया (first year admission process) राबविण्यात आली. त्यानुसार जुलै महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष वर्गास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे प्राध्यापकांच्यावतीने बहुतांशी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, काही विषयांमध्ये अभ्यासमंडळाद्वारे तयार करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम महाविद्यालयातील प्राचार्यांना पाठविण्यात आला. याशिवाय हे अभ्यासक्रम तत्काळ प्रभावाने राबविण्याचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे प्राध्यापक आणि प्राचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नव्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून शिकवायचे कसे? आणि जे शिकविले, त्याचे काय? असे अनेक प्रश्न प्राध्यापकांना पडले आहेत. दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
परीक्षा लांबण्याची शक्यता?
नव्वद दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर परीक्षांना (Exams) सुरुवात करण्यात येते. त्यानुसार विद्यापीठाद्वारे प्रथम सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये (First Semester in october) घेण्यावर भर आहे. त्यामुळे अशावेळी अचानक अभ्यासक्रमात बदल करीत तो शिकविण्यास सांगितल्यास विद्यार्थी कोणत्या आधारावर परीक्षा देणार ? हा प्रश्न आहे. दुसरीकडे प्रश्न नेमके कोणत्या अभ्यासक्रमानुसार काढायचे हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षाही लांबण्याची शक्यता आहे.
संदर्भग्रंथांचे काय?
प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संदर्भग्रंथाची (books for reference) गरज पडत असते. मात्र, सध्या नव्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असलेली संदर्भग्रंथ वा पुस्तके उपलब्ध आहेत का? हा ही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमके शिकविण्यावर मर्यादा (will affect teaching) येण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाचे प्रवेशद्वार सहा तास अडवले
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल सहा तास विद्यापीठाचे प्रवेशद्वारे अडवून ठेवले. विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ, वसतिगृहात दुसऱ्या पदवीला प्रवेश नाकारणे, व्यायामशाळा सेवा विद्यार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर धरणे दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
MahaRERA: कायद्यात 'ही' तरतूद नसल्याने प्रकल्प रद्द करण्यास विकासकाला परवानगी; महारेराचा मोठा निर्णय
India vs Australia Nagpur : सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच 'सोल्ड आऊट', सोशल मीडियावर 'ब्लॅक' मध्ये विक्री जोरात
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI