Ajit Pawar: देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना घळघळीत बंगला मिळाला; नवा पत्ता असा असणार..
हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार नागपुरात (Nagpur News) आल्यानंतर विजयगड बंगल्यातच मुक्कामी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत.
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Assembly Session) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नागपुरात आल्यानंतर विजयगड बंगल्यात मुक्कामी राहणार आहे. अजित पवार यांचा नागपुरातील नवीन पत्ता म्हणजे सिव्हिल लाईन्स परिसरातला 31/1 क्रमांकाचा विजयगड बंगला... हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार नागपुरात (Nagpur News) आल्यानंतर विजयगड बंगल्यातच मुक्कामी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत.
दरवर्षी हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतर ही जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री नागपुरात येतात, त्यांच्यासाठी विशिष्ट सरकारी बंगले तयार ठेवले जातात. नागपूर उपराजधानी असल्याने मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत. मात्र, सध्याच्या महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असताना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी कुठलाही बंगला उपलब्ध नव्हता.सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभागासोबत मिळून अनेक बंगल्यांची पाहणी केली.. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य असा बंगला मिळत नव्हता.
बंगल्याचे बांधकाम सुरू
अखेर उपमुख्यमंत्र्यांसाठी सिव्हिल लाईन्स परिसरात विजयगड बंगला निश्चित करण्यात आला आहे. सध्या विजयगड बंगल्यात दुरुस्ती, साज सज्जा आणि नवीन बांधकाम जोरात सुरू आहे. आजवर सहपोलीस आयुक्तांसाठी असलेला हा बंगला थेट उपमुख्यमंत्र्यांना दिला जात असल्यामुळे या बंगल्याच्या रचनेत उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसे बदल केले जात आहेत
अजित पवारांचा मुंबईत देवगिरीवर मुक्काम
वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास 16 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे 1999 ते 2014 या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकासआघाडीचे सरकार 2019 साली आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे. फडणवीसांनी देवगिरी बंगला अजित पवारांना देत मैत्री जपल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याच्या पाहायला मिळत आहे. सागर बंगल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार पाहतात .
हे ही वाचा :
Jalna : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष, खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप, विजयसिंह पंडित काढणार मोर्चा