एक्स्प्लोर

Nagpur Crime : रेशनचे 15 टन धान्य जप्त, काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

मुलगा शासकीय रेशनिंग दुकान चालवतो, तर वडील कळमना येथे धान्याचा ठोक व्यवसाय करतात. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून जप्त धान्य अन्न पुरवठा विभागाच्या स्वाधिन केले आहे.

नागपूर: परिमंडळ 3 चे डीसीपी गजानन राजमाने यांच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट'ने शासकीय रेशनचा (Ration black market racket) काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. बापलेक मिळून शासकीय धान्याची (Government supply grains) खुल्या बाजारात विक्री करून लाखो रुपयांचा नफा कमवत होते. मुलगा शासकीय रेशनिंग दुकान चालवतो, तर वडील कळमना येथे धान्याचा ठोक व्यवसाय करतात. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून जप्त धान्य अन्न पुरवठा विभागाच्या स्वाधिन केले आहे. अश्विन उर्फ बंटी कृष्णराव बोलधन (वय. 39, रा. जुना बगडगंज, धावडे मोहल्ला), किरण भास्कर धकाते (वय. 48, रा. मिनीमातानगर), संतोष प्राण कापसे (वय. 28) आणि वाहन चालक मनोज घनश्याम पुरी (30, रा. गंगाबाग, पारडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात बंटीचे वडील कृष्णराव बोलधन यांना आरोपी करणे निश्चित आहे. पोलिस त्यांच्या भूमिकेचा शोध घेत आहेत.

वाहनात ठेवली होती 33 पोती

जुना बगडगंज परिसरातील बंटी बोलधनच्या रेशन दुकानातून शासकीय धान्याचा साध्या पोत्यांमध्ये भरून काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर डीसीपी राजमाने यांच्या मार्गदर्शनात पथकाने बंटीच्या दुकानात धाड टाकली. यावेळी त्याच्या दुकानासमोर उभ्या एमएच-49/एटी-1168 क्रमांकाच्या पिकअप वाहनात पोलिसांना धान्याची पोती दिसली. 50 किलो वजनाचे 31 साधे आणि 2 सरकारी पोते वाहनात मिळाले. पोलिसांनी वाहन चालक मनोज पुरी आणि माल भरणाऱ्या संतोष कापसेची चौकशी केली असता बंटीने त्यांना त्याचे वडील कृष्णरावच्या कळमना येथील दुकानात ते पोहोचविण्यास सांगितल्याची माहिती मिळाली. बंटीला याबाबत विचारले असता तो उडवा-उडवीचे उत्तर देत होता. यामुळे त्याच्या गोदामाची झडती घेतली असता सरकारी धान्याची 100 पोती तांदूळ आणि 71 पोती गव्हाची मिळाली. सोबतच 68 साध्या पोत्यांमध्ये गहू आणि 9 पोत्यांमध्ये तांदूळ मिळाले. माहिती मिळताच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले. जवळपास 15 टन (Ton Gains) माल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जितेश आरवेल्ली, पकंज गुप्ता, पोहवा विनोद गवई, आशीष अंबादे, राजेश बेंडेकर, सूरज मडावी यांनी केली.

मोठ-मोठे माफिया उतरले मैदानात

धान्याचा काळाबाजार ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक दिवसांपासून शहरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू आहे. अनेक माफियांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर रेशनिंगच्या धान्याचा परवाना घेऊन दुकान उघडले आहे. गरीबांसाठी असलेला हा माल त्यांना मिळण्याऐवजी साध्या पोत्यांमधून थेट राईस मिलांपर्यंत पोहोचविला जातो. काही लोक किराणा दुकान उघडून बसले आहेत. काही टोळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन रेशनचे धान्य गोळा करण्याचे काम करतात. या व्यवसायात सर्वात सराईत माफिया अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांना टिप देऊन त्याने अनेकांचे दुकान बंद पाडले आहे. इतकेच नाहीतर धान्य परिवहनाचे कंत्राट घेणाऱ्यालाही त्याने बाजारातून हटविण्याचे काम केले. आता तो स्वत: मोठ्या प्रमाणात सरकारी धान्य थेट मिलांमध्ये पाठवतो. तेथे धान्य स्वच्छ झाल्यानंतर दक्षिणी राज्यांमध्ये जाते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा गुन्हा आहे का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Ramdas Kadam : भास्कर जाधव खोटा माणूस, आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; रामदास कदम यांचे टीकास्त्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget