RTMNU Exams : पावसामुळे 114 परीक्षा रद्द, 16 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार पेपर
एकूण 114 परीक्षा रद्द करण्यात आल्यात. बुधवारी रद्द झालेले पेपर हे 16 ऑगस्ट रोजी तर गुरुवारचे रद्द झालेले पेपर 21 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. तसेच अधिकृत पत्रही विद्यापीठाने प्रकाशित केले आहे.
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातही अशीच स्थिती आहे. एकीकडे शहरात घराघरात पावसाचे पाणी शिरत असताना, ग्रामीण भागात नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शिवाय भंडारा, गोंदिया आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशीच पुरपरिस्थिती असल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत कसे पोहोचणार हा प्रश्न निर्माण झाला होता.
शिवाय पुर परिस्थितीमध्ये बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. याच कारणामुळे खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने बुधवार सकाळपासून होणाऱ्या विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आजही सातत्याने सर्वत्र पाऊस पडतो आहे. त्यामुळे विद्यापीठाने दोन दिवसांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारचे 72 आणि गुरुवारचे 42 अशा एकूण 114 परीक्षा रद्द करण्यात आल्यात. बुधवारी रद्द झालेले पेपर हे 16 ऑगस्ट रोजी तर गुरुवारचे रद्द झालेले पेपर 21 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
Devendra Fadnavis : आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, बापू कुटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिप्राय
पूर्वानुभवातून नियोजन केलेच नाही
यापूर्वी नागपूर विद्यापीठाने अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परीक्षा रद्द करुन त्या पुढे ढकलल्या होत्या. या घटनेला महिनाही झालेला नाही. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. रविवारी पावसाने जोर धरला होता. त्यामुळे सोमवारी अतिवृष्टी झाली व प्रशासनाने पूर परिस्थिती असल्याचे जाहीर केले. यानंतर विद्यापीठाने दूरस्थ भागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी फोन करून माहिती व महाविद्यालयांकडून विनंती करण्यात यावी याची वाट पाहिली. परीक्षा विभागात नियोजनाचा अभाव असल्यानेच वेळेवर पेपर रद्द करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
दोन दिवसाचा अलर्ट
विद्यापीठाच्या क्षेत्रात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आदी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवसाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. मात्र, हा अलर्ट दोन दिवसाचा असला तरीही त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती अतिशय विदारक असल्याने अशा परिस्थितीत त्या ठिकाणी असलेल्या केंद्रावर विद्यार्थी कसे जाणार ? यामुळे किमान चार ते पाच दिवस परीक्षा रद्द करण्याची अपेक्षा होती.
Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्र्यांच्याआधी उपमुख्यमंत्र्यांचे नाव, ग्रामविकास विभागाला सापडला नाही फडणवीसांचा फोटो!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI