नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा जागता पहारा, शुक्रवार नमाजाच्या पार्श्वभूमीवर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा
Nagpur Violance: नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळाले आहे. नागपुरात बहुतांश मशिदींबाहेर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.

Nagpur Violance Update : नागपूरच्या (Nagpur) महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात 17 फेब्रुवारीला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. दरम्यान या घटनेला आज 5 दिवस उलटले असले तरी खबरदारी म्हणून पोलिसांनी (Police) काही भागात अद्याप संचारबंदी कायम ठेवत खडा पहारा तैनात करण्यात आला आहे. शहरतील नागपुरात दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली असून काही भागात 4 तास शिथिलता देण्यात आली आहे. तर हिंसाचार झालेल्या मध्य नगपूर भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. (Curfew)
दुसरीकडे, नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (21 मार्च) शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळाले आहे. नागपुरात बहुतांश मशिदींबाहेर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. अशातच अद्याप नागपुरात अजूनही काही भागात तणावग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरात काहीशी विशेष काळजी घेतली असल्याचे समजतंय. परिणामी, पुन्हा तणाव टाळण्यासाठी नागपूर पोलीस डोळ्यात तेल ओतून बंदोबस्तावर तैनात असून परिस्थिती हाताळत आहे.
नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी
उपराजधानी नागपूर शहरात दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 34 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतली म्होरक्या किंवा मास्टरमाईंड फहिम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानांकडून करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी
नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावाविरोधात प्रचार करण्यात आल्याचेही सांगितलं जातंय. तर तणावाला कारण झाल्याचा आरोप करत 'छावा' सिनेमावर बंदीची मागणी केली जात आहे. दरम्यान यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी ही केली जाणार असल्याचे सांगितलं जातंय. छावा सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा पत्राद्वारे आरोप करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















