VIDEO : ठाणे दहीहंडी उत्सवाची पंढरी, जितेंद्र आव्हाड या पंढरीचे विठ्ठल: अविनाश जाधव
Thane MNS Dahi Handi : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड उपस्थित राहिले.

Thane MNS Dahi Handi : मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात सुरू आहे. यंदा 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 'म... मराठीचा' असे बॅनर लावले आहेत. मनसेच्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहिले. त्यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांचे कौतुक केलं.
MNS Avinash Jadhav On Jitendra Awhad : नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव?
आव्हाड याच्या गोविंदात कायम पायरीवर उभे राहून गोविंदाचा कार्यक्रम बघायचो. आज आव्हाडसाहेब आमच्या दहीहंडी कार्यक्रमाला येतात त्यावेळी मन भरून येतं. ज्या माणसाने आम्हाला दहीहंडीचा सण दाखवला, दहीहंडी कशी लावायची सांगितलं, तो माणूस आमच्या व्यासपीठावर येतो. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
ठाणे ही दहीहंडीची पंढरी आहे आणि जितेंद्र आव्हाड हे त्याचे विठ्ठल आहेत. त्यांनी दहीहंडीला ग्लोबल स्वरुप प्राप्त करून दिलं.
ही बातमी वाचा:
























