Nagpur Riots: नागपूरमध्ये 234 सोशल मीडिया पोस्टमधून चिथावणी ,दंगल भडकवली; सायबर पोलिसांकडून मोठी अपडेट
फहीम खान मास्टरमाईंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर पोलीस सायबर सेलचे प्रमुख लोहित मतांनी यांनी सांगितले .

Nagpur Riots : नागपुरात औरंगजेबाच्या कबरी वरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मोर्चानंतर नागपूरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली .तुझ्या दगडफेकीत जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक जखमी झाले . नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा ठपका असणाऱ्या फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात मोठी अपडेट समोर आली आहे . नागपूरची दंगल 234 सोशल मीडिया पोस्टमधून भडकवल्याचे समोर आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे .या संदर्भात नागपूर पोलिसांनी 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली असून देशद्रोहाची कारवाई झालेला फहीम खान यानेही हिंसा भडकवण्यात प्रमुख भूमिका पार पाडली .तोच मास्टरमाईंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर पोलीस सायबर सेलचे प्रमुख लोहित मतांनी यांनी सांगितले . (Nagpur Violance Update)
काय सांगितले सायबर पोलिसांनी ?
नागपूरमध्ये उफाळलेल्या दंगलीमागे हिंसा भडकवण्याचे काम वेगवेगळ्या सोशल मीडिया यूजर कडून 234 पोस्टच्या माध्यमातून केल्याचे तपासात समोर आले आहे .या संदर्भात नागपूर पोलिसांनी चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली .फहीम खान ने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसा भडकवणाऱ्या चितामणी कोर पोस्ट केल्याचे उघड झाले आहे .फहीम खान याने हिमसा भडकवण्यात प्रमुख भूमिका पार पाडली .तोच मास्टर माइंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर सायबर सेलचे प्रमुख रोहित मताने यांनी सांगितले .फहीम खानच्या बांगलादेश कनेक्श बाबत तपास केला जात असल्याचेही रोहित मतानी म्हणाले .
बांग्लादेश कनेक्शन
नागपुरात सोमवारी उफाळलेल्या हिंसाचारा आधी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने मोठी कारवाई केली आहे .अनेक सोशल मीडिया अकाउंट वरून चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे .दरम्यान नागपूरच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवलेले फेसबुक खाते ही ओळखल्याने नागपूरच्या दंगलीचे आणि बांगलादेशचे कनेक्शन असल्याचे समोर आले . सोशल मीडियाचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठी होत नसून त्यावर अफवाही पसरवल्या जात आहेत त्यामुळे सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधून संबंधित खाती ब्लॉक करण्याची विनंती केली .तब्बल 234 पोस्टवरून हिंसा भडकवण्याचे काम झाल्याचे सायबर सेलने म्हटले आहे .याबाबत अधिक तपास सुरू आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

