RSS Boudhik : नागपुरातील संघाच्या बौद्धिकासाठी महायुतीला निमंत्रण, अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार? अमोल मिटकरींचं एका शब्दात उत्तर
RSS Boudhik : नागपुरात येत्या रविवारी (14 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) बौद्धिकाचे (RSS Bauddhik) आयोजन केलं आहे.

RSS Bauddhik : नागपुरात येत्या रविवारी (14 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) बौद्धिकाचे (RSS Bauddhik) आयोजन केलं आहे. उद्याच्या या बौद्धिकाला महायुतीतील (MahaYuti) अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. असे असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती आता पुढे आली आहे. संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची, प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिलीय.
Amol Mitkari : संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
दरम्यान, मागच्या वर्षीही संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुणीही उपस्थित राहिलं नव्हतं. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू -फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा असल्याचे म्हटलंय. संघाकडून उद्याच्या बौद्धिकचं महायुतीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना निमंत्रण आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बौद्धिकाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे.
Akola News : अकोल्यात वेगळंच चित्र!, 'स्ट्राँग रुमबाहेर उमेदवारांसह एकही कार्यकर्ता नाही
राज्यातल्या बहुतांश भागात 'इव्हीएमच्या स्ट्राँग रुम'बाहेर पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून कडक पहारा दिलाय जातोय. मात्र, अकोल्यात वेगळं चित्र पाहायला मिळातंय. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पोलिसांच्याच बंदोबस्तावर विश्वास ठेवलाय. अकोल्यातल्या चार नगरपालिका आणि एका नगरपंचायत अशा पाचही ठिकाणी 'इव्हीएमच्या स्ट्राँग रुम'बाहेर 24 तास कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्याच्या तापमानाचा पारा दहा अंशांच्या आसपास पोचलाय, तर ग्रामीण भागातलं तापमान 10 अंश सेल्सिअस खाली गेलंये. रात्रीच्या 12 नंतर 'एबीपी माझा'ने जिल्ह्यातील हिवरखेड, तेल्हारा या ठिकाणच्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय. या कडाक्याच्या थंडीतही पोलीस डोळ्यात तेल घालून स्ट्राँग रुम'बाहेर कडक पहारा देतायेत. अकोल्यातील अकोट, हिवरखेड, मुर्तीजापुर, बार्शीटाकळी आणि तेल्हारा या पाचही ठिकाणी उमेदवारांचा कार्यकर्त्यांनी अकोला पोलिसांच्या बंदोबस्तावर विश्वास ठेवल्याचे चित्र आहेय.
हे देखील वाचा
























