एक्स्प्लोर

Shivsena UBT: अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड; महानगरप्रमुख अन् महापालिकेतील गटनेत्यासह चार नगरसेवकांचा पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Shivsena UBT: पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अकोला : अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena UBT) गटाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shinse Shivsena) प्रवेश केला आहे. नागपुरातील एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या 'देवगिरी' शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडलाय. राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.‌ यासोबतच काही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) अकोला शहरात मोठं खिंडार पडलंय. तर मिश्रांच्या पक्षप्रवेशाने शिंदे यांच्या शिवसेनेला (Shinse Shivsena) शहरात मोठं बळ मिळालंय. मावळत्या अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत (Shinse Shivsena) प्रवेश केलाय. (Shivsena UBT)

राजेश मिश्रा यांचे कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून अकोला महापालिकेच्या राजकारणात आहेत. मिश्रा यांचे वडील, आई, ते स्वत:, पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. राजेश मिश्रा यांनी 2024 ची निवडणूक अकोला पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवत अडीच हजारा़पर्यंत मतं घेतली होती. त्यांच्यामुळेच अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे राजेश मिश्रांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे महायुतीतील भाजपचे स्थानिक नेते यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय आहे. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात  आहे.आता डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Who is rajesh Mishra: कोण आहेत राजेश मिश्रा 

- ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते. 
- राजेश मिश्रांचा अकोल्याच्या जुने शहर भागातील हरिहरपेठ भागात मोठा दबदबा. 
- 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजेश मिश्रांनी स्वत: आणि पत्नीसह सर्वच्या सर्व चार जागा आणल्या होत्या निवडून. 
- गेल्या 40 वर्षापासून मिश्रा कुटूंबिय नगरपालिका आणि महापालिका सभागृहात. 
- मिश्रा यांचे वडील, आई, ते स्वत:, पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिलेत. 
- राजेश मिश्रा ठाकरे गटाचा अकोला शहरातील कट्टर हिंदूत्ववादी चेहरा. 
- 2014 मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून राजेश मिश्रांनी अपक्ष म्हणून घेतलेल्या 2500 मतांमुळे भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव. काँग्रेसचे साजिदखान पठाण विजयी.

 

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Embed widget