Nagpur News : ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर शोभायात्रेच्या मार्ग ठरला; नागपूर हिंसाचार घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा खडा पहारा!
Nagpur: पोद्दारेश्वर राम मंदिर शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रेच्या मार्गसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह होते. मात्र आयोजकांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन यात्रेच्या आयोजन संदर्भात नियोजन केले आहे.

Nagpur News : रामनवमीच्या दिवशी नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून (Shri Poddareshwar Ram Temple) मोठी शोभायात्रा निघते. मात्र काही दिवसांपूर्वी नागपुरात महाल आणि जवळपासच्या परिसरात जोरदार हिंसाचार (Nagpur Violance) झाला. विशेष म्हणजे ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातूनच शोभायात्रा मार्गक्रमण करते. त्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रेच्या मार्गसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह होते. आयोजकांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन यात्रेचे शांततेने आयोजन संदर्भात नियोजन केले आहे. शोभायात्रेचा मार्ग नेहमीसारखाच राहील, असे ही जाहीर केले आहे. दरम्यान, पोलिसांनी (Nagpur City Police) त्या संदर्भात चोख बंदोबस्त केल्याचा आयोजकांचा विश्वास आहे.
हिंदू-मुस्लिम समाजातील मान्यवरांकडून शोभायात्रा शांततेत पार पाडण्याचे नियोजन
प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त पोद्दारेश्वर मंदिरातून निघणारी "श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा" रविवारी आयोजित करण्यात आली आहे. शोभायात्रेचे हे 58वे वर्ष असून मध्य नागपुरातील मोमीनपुरा, हंसापुरी, इतवारी, महाल परिसरातून मार्गक्रमण करत पुढे जात आहे. नागपुरात 17 मार्चला झालेल्या हिंसाचार प्रभावित भागातूनच शोभयात्रेचा मार्ग राहणार आहे. हिंसाचाराच्या घटनेमुळे श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे शोभयात्रेपूर्वी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांनी शोभायात्रा शांततेत पार पाडण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने पोलिसांचाही शोभयात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त असणार आहे. अशी माहिती श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजक पुनित पोद्दार यांनी दिली आहे.
दोन हजार पोलिसांचा फौजफाट, ड्रोनची ही असणार नजर
नागपूर हिंसाचारानंतर उद्या (6 एप्रिल) रामनवमीला निघणाऱ्या पहिल्याच रामनवमी शोभायात्रेसाठी पोलीसांचा चोख पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या शोभायात्रेसाठी नागपूर पोलिसांचा दोन हजार पोलिसांचा फौजफाट रस्त्यावर तैनात असणार आहे. शिवाय ड्रोनच्या मध्यातून पोलिसांची रामनवमी शोभा यात्रेवर नजर असणार आहे. नागपूरच्या पोद्दारेश्वर राममंदिरातून हि शोभा यात्रा निघते जी पुढे हंसापुरी , शाहिद चौक, कोतवाली ,सुभाष रोड , कॉटनमार्केट , सीताबर्डी मार्गे परत राममंदिरात येते.
नागपूरची हि शोभायात्रेला ऐतिहासीक महत्व असून आकर्षणाचं केंद्र असतं, त्यामूळे हि शोभायात्रा बघायला हजारोंची गर्दी रस्त्याच्या दुतर्फा असते. मात्र अलिकडे नागपुरात दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर या शोभायात्रेत काही बदल करण्यात येतो का? या कडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र या शोभायात्रेच्या मार्गात कुठलेही बदल न करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























