एक्स्प्लोर

Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट

Zeeshan Siddique : आमदार झीशान सिद्दिकी यांनी वडील बाबा सिद्दिकी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काढलेला आहे. झिशान सिद्दिकी यांनी वडिलांबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला  मुंबईतील वांद्रे पूर्व मध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 14 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.

झिशान सिद्दिकींच्या पोस्टमध्ये काय?

5 वर्षांपूर्वीच्या निकालाच्या दिवसाचा फोटो शेअर करत 'हा क्षण तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे शक्य झाला', असं झिशान सिद्दिकी म्हणाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी एक्स प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट केली.पाच वर्षांपूर्वीच्या 24 ऑक्टोबर या दिवशीचा बाबा सिद्दीकींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

"तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते,  बाबा, मला रोज तुझी आठवण येते", असं झिशान सिद्दिकी म्हणाले.

पाच वर्षापूर्वी निकालाच्या दिवशी या क्षणाचा फोटो काढला गेला होता. तुमची कठोर मेहनत आणि माझ्यावरील विश्वासामुळं ते शक्य झालं होतं. तुम्ही आता निघून गेलात, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं बळ अनुभवतोय, तुम्ही त्यांच्यासाठी केलेलं काम आणि समर्पण हे देखील अनुभवतोय. तुमची रोज आठवण येते, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.

झिशान सिद्दिकी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी देखील उतरणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी 14 जणांना अटक

बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करण्यात आला होता. बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणाऱ्यांपैकी गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप या दोघांना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी प्रविण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर, हरियाणातून अमित कुमार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे. 

इतर बातम्या :

श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024Yugendra Pawar on Ajit Pawar : आता बाण सुटला...काकांविरोधात युगेंद्र पवारांनी शड्डू ठोकले!ABP Majha Headlines : 6 PM : 24 October 2024 :  एबीपी माझा 6 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Embed widget