एक्स्प्लोर
Advertisement
काकूंच्या 1800 रुपयांच्या व्हिडिओ वर मंत्री यशोमती ठाकूर यांची गंभीर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. या व्हिडिओ वर मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर घरगुती काम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ सोशल मीडिया शेअर करुन मजेशीर कॅप्शन देत आहे. या व्हिडीओचे मीम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांचे कान टोचलेत. फेसबुकवर पोस्ट लिहित या प्रकणावर त्यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पोस्टमध्ये काय आहे?
"घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे, या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत."
काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओ ती महिला काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागत आहे. ते तरुण तिला 1800 रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार दिसत नाही. सदर तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोट आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे. ती म्हणते की तुम्ही मला 500 च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे अठराशे रुपये हवे आहे. त्यावर त्या तरुणांना काय करावं कळेना.
व्हिडीओचा विरोधकांवर टीका करण्यासाठी वापर
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा व्हिडीओ ट्वीटर वर शेअर घसरलेल्या जीडीपी वर निशाणा साधला आहे. तर हाच ट्वीट रिट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील विरोधपक्षांवर टीका केलीय.
University Exams | केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? मंत्री उदय सामंत यांचा सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement