एक्स्प्लोर

महिलेला चिरडलं, तिथून गोरेगावला गर्लफ्रेंडचं घर गाठलं; वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा फरार, गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

Worli Hit And Run: वरळीत महिलेला चिरडलं, त्यानंतर गोरेगावला गर्लफ्रेंडचं घर गाठलं, पोलिसांकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचा शोध सुरू.

Worli Hit And Run Accident: मुंबई : वरळीतील (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Case) अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वरळीत (Worli Police) महिलेला आपल्या गाडीखाली चिरडून फरार होणारा आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shaha) यांचा मुलगा असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. अपघात झाला त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत (White BMW Car) आरोपी मिहीर शहा (Mihir Shaha) आणि ड्रायव्हर असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून मिहीर शहाचा कसून तपास सुरू आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं आपल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारनं एका महिलेला चिरडलं आणि अपघातानंतर तिथून पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरचे वडील शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत. 

अपघातानंतर गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला, तिथून मोबाईल बंद करुन फरार

वरळी हिट अॅड रन प्रकरणात वरळी पोलिसांकडून तपासासाठी वाहनाच्या इन्स्पेक्शनसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक टिम बोलावलेली आहे. पोलीस मुख्य आरोपी मिहीरच्या मागावर असून त्याचं लोकेशन ट्रेस करत आहेत. अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वरळी पोलिसांनी मिहीरच्या वडिलांपाठोपाठ गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतलं आहे. गोरेगांवहून सकाळी आठ वाजता आरोपी मिहीर गर्लफ्रेंडच्या घरातून वांद्र्याला मित्राकडे जातो, असं सांगून निघाला. त्यानंतर त्यानं त्याचा फोन बंद करुन टाकला. दरम्यान, वरळी पोलिसांचं आणखी एक पथक वांद्र्याला रवाना झालं आहे. 
 
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे. यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला आहे. वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडली.

नेमकं काय घडलं? 

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात; अपघातावेळी गाडीत असलेला मुलगा, ड्रायव्हर फरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget