एक्स्प्लोर

Worli Hit And Run: पुणे पोर्शे अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांप्रमाणेच, वरळीच्या 'हिट अँड रन'मध्येही संपूर्ण शाह कुटुंब दोषी?

Worli Hit And Run Accident: पुणे पोर्शे प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे.

Worli Hit And Run : मुंबई : वरळी (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Accident) फक्त मिहीर शाहच (Mihir Shah) नाहीतर संपूर्ण शाह कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे (Pune News) पोर्शे अपघात (Porshe Accident Case)  प्रकरणाप्रमाणेच संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासात उघड झालं आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी मिहीर शाहला त्याच्या वडीलांनी तिथून पळून जा, आपण सर्व आरोप ड्रायव्हरवर टाकू, असा सल्ला दिल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यानंतर मिहीरनं तिथून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरच्या वडीलांना अटक करत कोर्टात हजर केलं होतं. पण कोर्टानं राजेश शाहला जामीन मंजूर केला आहे. 

नेमकं काय-काय घडलं? पोलिसांनी कोर्टात सांगितलं... 

पुणे पोर्शे प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातही अपघातानंतर मिहीर शाहला त्याचे वडील राजेश शाह यांनी पळून जाण्याच्या सूचना दिलेल्या. त्यानंतर मिहीरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचं घर गाठलं.  तिच्या घरी जाण्यापूर्वी त्यानं तिला 30 हून अधिक फोन केले. गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचल्यावर तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तो दोन तास तिथेच झोपला. गर्लफ्रेंडनं मिहीर तिच्या घरी आल्याची माहिती फोन करुन त्याच्या घरी आई आणि बहिणीला दिली. ते समजताच आई आणि बहिणीनं गर्लफ्रेंडचं घर गाठलं. तिथून मिहीरला घेऊन त्या दोघी बोरिवलीला गेल्या. बोरीवलीच्या घराला कुलूप लावून मिहीर, आई आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे याप्रकरणी मिहिरची आई आणि बहिणीलाही पोलीस आरोपी करण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस तपासात मिहीरचा मोबाईल पश्चिम द्रूतगतीमार्गावर कांदिवली-बोरिवली दरम्यान बंद केल्याचं समोर आलं आहे. तेच त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवला आहे. 

तिथून पळ, सगळं ड्रायव्हरनं केलंय सांगू; वडीलांचा मिहीरला वाचवण्यासाठी प्लान 

पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणे, वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणातही मुख्य आरोपी मिहीरला त्याचे वडील आरोपी शिवसेना उपनेते राजेश शहा यांनी 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरनं केला आहे असं सांगू, असा सल्ला दिला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच, वांद्रे येथे मिहीरची गाडी बंद पडल्यानंतर आरोपी राजेश शहा यांनी गाडीची नंबरप्लेट बदलण्याचा आणि गाडीवरील स्टिकर खोडल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्यआरोपी मिहीर शाह हा अद्याप फरार असून मिहीर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथकं स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही मिहीरचा शोध घेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Worli Hit And Run : "तिथून पळून जा, अॅक्सिडंट ड्रायव्हरनं केलाय सांगू"; पुण्यातील 'लाडोबा'च्या बापाप्रमाणेच राजेश शाहचाही मिहीरला वाचवण्याचा प्लान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपीGanga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?Beed Madhav Jadhav : निवडणूक काळात माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखलCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget