एक्स्प्लोर

Worli Hit And Run : "तिथून पळून जा, अॅक्सिडंट ड्रायव्हरनं केलाय सांगू"; पुण्यातील 'लाडोबा'च्या बापाप्रमाणेच राजेश शाहचाही मिहीरला वाचवण्याचा प्लान

Mumbai Accident News: मुंबई पोलिसांनी राजेश शाह (Rajesh Shah) यांना कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक दावे कोर्टात केल्याचं समोर आलं. 

Worli Hit And Run : मुंबई : पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) वरळी हिट अँड रन (Worli Hit And Run Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. पुण्यातील लाडोबानंतर शिवसेना उपनेत्याच्या मुलानं वरळीत आपल्या महागड्या कारनं एका महिलेला चिरडलं. तेव्हापासूनच मुख्य आरोपी फरार आहे. तर, काल (सोमवारी) आरोपीचे वडील राजेश शाह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी राजेश शाह (Rajesh Shah) यांना कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक दावे कोर्टात केल्याचं समोर आलं. 

वरळी हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला वाचवण्यासाठी अपघातावेळी त्याच्यासोबत असलेल्या ड्रायव्हरवर सर्व दोष टाकण्याची योजना मिहीरच्या वडिलांनी आखली होती. अपघातानंतर राजेश शाहनं मुलगा मिहीरला ड्रायव्हरसोबत लोकेशन बदलण्यास सांगितलं आणि त्यासाठी दोघांचे अनेक वेळा कॉलवर बोलणंही झालं. 

मिहीरचं निर्दयी कृत्य, महिलेला दीड किलोमीटर फरफटत नेल्यानंतर पुन्हा चिरडलं

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेत्याच्या मुलानं कावेरी नाखवा यांना गाडीनं धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. पुढे जाऊन वरळी सिलिंक येथे मिहीरनं गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं, ड्रायव्हर राजऋुषी गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्यावेळी दोघांनी गाडी बाजून घेऊन जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्यानं गाडी पाठीमागे घेतली आणि थेट कावेरी यांच्या अंगावर घालून तिथून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.  

राजेश शाह यांना जामीन मंजूर 

सोमवारी न्यायालयानं वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अपघातानंतर मिहीरनं घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली, त्यानंतर त्यानं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.

पोलिसांकडून लूक आउट नोटीस जारी 

मुंबई पोलिसांनी मिहीरविरोधात लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केलं आहे. मिहीर शाह देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी त्याच्याविरुद्ध एलओसी जारी केली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्याचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार केली आहेत. अपघाताच्या वेळी मिहीर दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे, कारण घटनेच्या काही तासांपूर्वी तो जुहू परिसरातील एका बारमध्ये दिसला होता.

नेमकं काय घडलं? 

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकानं गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावलं. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget