एक्स्प्लोर

Worli Accident : वरळी पुन्हा हादरली; BMW च्या धडकेत तरुणाचा मृत्यू, आठ दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी

Worli Accident : वरळी सीफेसवर बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तब्बल 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तरुणानं अखेरचा श्वास घेतला.

Worli Accident : मुंबई : हिट अँड रन (Hit And Run Case) प्रकरणानंतर आणखी एका अपघातानं वरळी (Worli Accident) हादरली आहे. वरळीत (Worli) बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 20 जुलै रोजी वरळीत ठाण्यातील (Thane Accident) व्यावसायिकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तरुणानं शेवटचा श्वास घेतला. अपघातावेळी व्यावसायिकाचा चालक गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर खळबळ माजली होती. अशातच आणखी एका अपघातानं वरळी हादरली आहे. वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर 20 जुलै रोजी बीएमब्यल्यूनं एका तरुणीला मागून येणाऱ्या मोटरगाडीनं धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार विनोद लाड (वय 28) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान शनिवारी विनोदचा मृत्यू झाला. 

मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. मोटरसायकलवरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला होता. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. मोटरगाडी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी तो ठाण्याहून वरळीमध्ये आला होता. दरम्यान, अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

काही दिवसांपूर्वी वरळीत घडलेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. आधी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यानंतर वरळीतील हिट अँड रन, दोन्ही प्रकरणांमध्ये बड्या बापाच्या लेकांचे कारनामे समोर आले होते. वरळीतील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर, पुण्यातील अपघातात दोन इंजिनिअर्सचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. दोन्ही प्रकरण हायप्रोफाईल होती. दोन्ही प्रकरणांमध्ये जसजशी चौकशी होत गेली, तसतसे अनेक खळबळजनक खुलासे होत गेले. अशातच आणखी एका अपघातानं वरळी हादरली होती. आता सातत्यानं एकापाठोपाठ एक होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget