एक्स्प्लोर
दादर रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती, पोलीस बनले देवदूत
रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई : दादर रेल्वे स्थानकातच एका महिलेची प्रसूती झाली आहे. रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दादर रेल्वे स्टेशन वर 24 डिसेंबर रोजी पहाटे 1.50 वाजता गीता दिपक सतय्या (वाघरे), वय-21 वर्षे, रा. जेजुरी ह्या त्यांच्या पती व दोन लहान मुलांसह त्यांना पुणे येथे जाण्यासाठी आल्या होत्या. फलाट क्रमांक 4 वर कँटीनजवळ गाडीची वाट पाहत बसल्या होत्या. अचानक त्यांना प्रसूतीवेदना होऊ लागल्या. हे पाहताच तिथे उपस्थित असलेल्या लोहमार्ग दलातील महिला पोलिसांनी गीता यांना त्वरित आश्रय देवून चादरीचा आडोसा केला. सोबतच 108 क्रमांकावर संपर्क करून डॉक्टरांना पाचारण केले.
यानंतर तिथेच गीता यांची प्रसूती झाली. त्यानंतर त्यांना व नवजात बालकाला तात्काळ सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदर महिला व तिचे बाळ सुखरूप आहे.
जीआरपीएफ महिला व पुरुष पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपणारी कामगिरी केल्याने गीता व तिच्या पटीने त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही माणूस नसून देवदूत आहात अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement