एनआयएला सापडलेली सचिन वाझेंची डायरी 100 कोटींची गुपितं उघडणार?
वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 16 मार्च रोजी सीआययू कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही कागदपत्रे मिळाली होती.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. अटकेनंतर एनआयएच्या पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये एनआयएला अनेक वस्तू मिळाल्या आहेत. त्यापैकी तेथे सापडलेल्या डायरीतून अनेक खुलासे होतील असा दावा एनआयएने केला आहे.
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना सचिन वाझे यांच्या कार्यालयात एक डायरी मिळाली आहे. ज्यामध्ये पैशाच्या व्यवहाराबद्दल एन्ट्री दिसते आहे आणि कोडवर्डमध्ये ही काही नोंदी दिसत आहेत. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते, असं तपास यंत्रणांचं मत आहे.
परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्विस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना पैसे गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला.
वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 16 मार्च रोजी सीआययू कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही कागदपत्रे मिळाली होती. तेव्हा त्याच छापेमारीदरम्यान एनआयएला तिथून एक डायरीही मिळाली ज्यात बऱ्याच पैशाच्या व्यवहारांची नोंद आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कमी तीव्रतेचं
एनआयएच्या एका वरिष्ठ अधिका्ऱ्याने एबीपी न्यूजला सांगितले की, त्यांना ही डायरी सापडली आहे पण त्यात काय आहे का याची चौकशी सुरु आहे. डायरीची तपासणी अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता एनआयए लवकरच या प्रकरणात ईडीला पत्र लिहू शकते आणि या प्रकरणातील मनी लाँडरिंग अँगलने चौकशी करण्यास सांगू शकते.