एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या, पती अटकेत
नालासोपारा: क्षुल्लक कारणावरुन नालासोपाऱ्यामध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. चाळीतल्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरुन राजेंद्र सावंत यानं पत्नीवर घरातील चाकूनं सपासप वार केले. यामध्ये रंजना सावंत यांचा मृत्यू झाला.
चाळीत सांस्कृतिक कार्यक्रम चालू असल्याने, या उत्सवात रंजना सहभागी झाल्या होत्या. रात्री साडे नऊच्या सुमारास राजेंद्र कामावरुन घरी आल्यानंतर घरात कोणी नव्हते. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते आणि त्याला झोपायचे होते. त्यामुळे मला झोपायचे आहे घर साफ करं असं त्यानं पत्नीला सांगितलं. पत्नीनं ते वेळेत साफ केलं नाही. यातून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून राजेंद्र सावंतने चाकूने पत्नीवर सपासप वार केले.
तसेच हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सूनेवरही राजेंद्र यांनी वार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र पत्नीकडून घटस्फोट मागत होता. पण रंजना घटस्फोट देत नव्हत्या. त्याचाच राग मनात धरून आणि चाळीतल्या कार्यक्रमाचं कारण पुढे करत राजेंद्रनं पत्नीची हत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement