एक्स्प्लोर

Mahadev App : रणबीर कपूरला ईडीच्या कचाट्यात आणणाऱ्या महादेव अॅपची मोडस् ऑपरेंडी नेमकी कशी आहे?

Mahadev App : महादेव अॅप नेमकं आहे तरी काय, बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी का करण्यात येणार?

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि इतर सेलिब्रेटी ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. महादेव अॅपमुळे  ईडीकडून आता बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये महादेव अॅपमुळे राजकीय सल्लागार, नेते अडचणीत आले.  महादेव अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.  


महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल अशा विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. भारतातील विविध निवडणुकांवर सट्टा लावण्यात येतो.


महादेव अॅप प्रकरणातील मोडस ऑपरेंडी काय आहे?

रणबीर कपूरने सोशल मीडियावर या अॅपची जाहिरात केली.  इतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर अॅपच्या जाहिराती दिल्या. त्यानंतर या सेलिब्रेटींना हवाला ऑपरेटर्सद्वारे रक्कम देण्यात आली. ईडीने अद्याप या अभिनेते, सेलिब्रेटी, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर यांना किती रक्कम मिळाली हे उघड केलेले नाही. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100 सोशल मीडिया  इन्फ्लुएन्सरवरही बेकायदेशीर महादेव अॅपचा प्रचार केल्याचा आणि त्याचा  मोबदला म्हणून, मोठी रोख रक्कम  स्वीकारल्याचा संशय आहे.


>> अॅप कसे काम करायचे?

-  हे अॅप UAE च्या बाहेर आधारित आहे

-  अॅपच्या युजर्ससाठी, अधिक ग्राहकांना वळण्यासाठी त्यांचे कॉल सेंटर्स आहेत. हे कॉल सेंटर्स नेदरलँड, नेपाळ, श्रीलंका, यूएई मधून चालवण्यात येतात. 

- जेव्हा ग्राहक या केंद्रावर कॉल करतात तेव्हा त्यांना एक व्हॉट्सअॅप नंबर दिला जातो, जिथे त्यांना त्यांचे तपशील शेअर करावे लागतात.

-  त्यानंतर हा तपशील भारतातील पॅनेल ऑपरेटरसोबत शेअर केला जातो. जे प्रामुख्याने भारतातील शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि चंदिगड, छत्तीसगडमधील काही लहान शहरांमध्ये कार्यरत आहेत.

- असे 4000-5000 पॅनेल ऑपरेटर आहेत.  हे पॅनल ऑपरेटर UPI आणि बँक खात्यांद्वारे ग्राहकांशी बँक व्यवहार सुरू करतात.

- या पॅनल ऑपरेटर्सची बनावट बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये पैसे वळवले जातात.

- प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, त्यांना त्यांच्याद्वारे अॅपवर भरलेल्या रक्कमेच्या 60 टक्के परत दिले जातात.

- गुंतवणुकीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम पॅनेल ऑपरेटरकडे असते. त्यापैकी 70 टक्के रक्कम ते त्यांच्याकडे ठेवतात.  उर्वरित 30 टक्के रक्कम महादेव अॅपवर जाते.

- या पॅनेल ऑपरेटर्सचा दररोजचा सरासरी नफा दररोज 200 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे

- या खात्यातील व्यवहार दर सोमवारी महादेव अॅपद्वारे सेटल केले जातात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget