एक्स्प्लोर

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट न थांबल्यास राज्यव्यापी आंदोलन; हिंदू जनजागृती समितीचा इशारा

Mumbai: राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दीडपटीपर्यंत आकारता येईल, असा शासनाचा निर्णय आहे.

Mumbai: राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दीडपटीपर्यंत आकारता येईल, असा शासनाचा निर्णय आहे. मात्र हा शासन निर्णय धाब्यावर बसवून अनेक खासगी ट्रॅव्हल्सकडून दुपटीहून अधिक तिकीट दर आकारून प्रवाशांची भरमसाठ लूटमार केली जात असल्याचा तक्रारी पुढे येत आहे. याची तक्रार करूनही कारवाई प्रशासनाकडून केली जात नसल्याने, नागरीकांसह हिंदू जनजागृती समिती राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

तक्रार काय आहेत ?

अभिषेक मुरुकटे हे मुंबईत राहणारे गृहस्थ सांगतात की, मी ‘रेड बस’च्या ॲपवरून मोहन ट्रॅव्हल्स (घाडगे पाटील) या गाडीचे 22 मे 2022 चे मुंबई-कोल्हापूर तिकीट काढले. या तिकिटासाठी माझ्याकडून 1 हजार 995 रुपये घेतले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई-कोल्हापूर वातानुकूलित गाडीच्या मुंबई ते कोल्हापूर तिकिटाचा दर 840 रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम 1 हजार 260 इतके तिकिट आकारता येऊ शकते. तरीही माझ्याकडून तिकिटाचे 735 रुपये अधिक घेण्यात आले. या प्रकारानंतर मी विविध खासगी ट्रॅव्हल्सचे दर पाहिले असता बहुतांश गाड्यांचे दर भरमसाठ असल्याचे आढळून आले. एका प्रवाशाकडून 735 रुपये एवढी अतिरिक्त रक्कम घेतली जात असेल, तर राज्यभरातील लाखो प्रवाशांकडून किती कोट्यवधी रुपये उकळले जात असतील, याची कल्पना येते. राज्यातील लाखो प्रवाशांची अशा प्रकारे होणारी नियमित फसवणूक त्वरित थांबवायला हवी, असे तक्रारदार  मुरुकटे यांनी सांगितले.

तक्रार केली मात्र कारवाई नाही!

खासगी वाहतूकदारांकडून नागरिकांची लूट होते, यासंदर्भात अनेक तक्रारी घेऊन हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे नियमबाह्य तिकीट दर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या नावांची सूची पुराव्यांसह सुपूर्द केली होती. त्यावेळी आयुक्तांनी याची दखल घेण्याचे दूरच, पण शिष्टमंडळाने दिलेली कागदपत्रे पहाण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. याउलट त्यांनी तक्रारदारांना ‘कुणी अधिक पैसे घेतल्यास अन्य ट्रॅव्हल्सचे तिकिट काढा. ऑनलाईन वेबसाईटवरून आकारल्या जाणार्‍या किमतीवर आमचे नियंत्रण नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याएवढे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. कारवाईची माहिती संकेतस्थळावर दिली, तर आमचा उपद्व्याप उपद्व्याप वाढतो. आम्ही आमच्या सोयीनुसार कारवाई करतो’, असे बेजबाबदारपणाचे उत्तर डॉ. ढाकणे यांनी दिले. त्यामुळे हे परिवहन आयुक्त आहेत की जनतेची लूटमारी करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल तक्रारदार व हिंदू जनजागृती समितीने उपस्थित करत, खासगी वाहतूक धारकांसह आयुक्तांवर कारवाईची मागणी केलीय. यासंदर्भात परिवहन आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही.

लूट थांबली नाही तर...

शासनाच्या निर्णयाप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बूकिंग करणारी तथा गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेले राज्य परिवहन बसचे दरपत्रक लावावे. त्याविषयी तक्रार असेल, तर तक्रारीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावा. लूटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करावी, तसेच ऑनलाईन तिकीट विक्री करतांना भरमसाठ दर आकारणार्‍या खासगी प्रवासी टॅ्रव्हल्स एजन्सीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा मागण्याही हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत करण्यात आल्या आहेत. जर हे थांबले नाही तर हिंदू जनजागृती समिती राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे हिंदू जनजागृतीचे पदाधिकारी सतीश कोचरेकर यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाVijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रियाCity Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 September 2024Prakash Ambedkar PC : महाराष्ट्र बिहार नाही, निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजे: आंबेडकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Sharad Pawar : देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Embed widget