Deepak kesarkar : आम्हीही व्हीप बजावल्याने शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस काढू शकतो, शिंदे गटाच्या दीपक केसरकरांचा विधानसभेत पवित्रा
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.
Deepak Kesarkar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात चांगलीच टोलेबाजी रंगली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.
ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय मी आपले निवडीसाठी अभिनंदन करतो, त्यामुळे आज राजकीय भाषणे होत नसतं. या ठिकाणी भाषणे झाली त्याच्यामध्ये व्हीपचा उल्लेख झाला, तसा आम्हीही काढलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसवर दिला आहे. त्यामुळे आजचा दिवस चर्चा करायची नाही, अन्यथा आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा तुम्हाला व्हीप दिला आहे. आम्ही सुद्धा त्यांना अपात्रतेसाठी बोलू शकतो, पण आम्ही ते बोलणार नाही. आजचा प्रसंग तो बोलण्याचा नाही. प्रसंग आपला अभिनंदन करण्याचा आहे.
तत्पूर्वी, दीपक केसरकर म्हणाले की, मुंबई राज्य म्हणून ओळखले जातात तेव्हा 1937 साली गणेश माळवणकर यांनी त्याचे अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यानंतर लोकसभा स्थापन झाली, त्याला सुद्धा मानकर लोकसभेचे अध्यक्ष होते. आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कदाचित आमच्या समोरील अध्यक्ष पुढे जाऊन लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकतील अशीच शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे मी या निमित्ताने एवढेच सांगतो की, ज्या विधानसभेमधून येतात आणि त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याला बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा आहे, त्याला प्राध्यापक मधु दंडवते यांचा वारसा आहे. मी एक स्वप्न बघतो की ही सर्व लोकं हे विद्वान म्हणून ओळखले जात होते आणि ज्या ज्या वेळेला लोकसभेमध्ये भाषण करायचे त्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभेमध्ये यायचे आणि एक विद्वान आज आमच्या विधानसभेचे अध्यक्ष होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु, पुढे होऊन या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे आणि आपण लोकसभेचे अध्यक्ष व्हावं अशी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Rahul Narvekar : विधिमंडळात सासरे-जावई यांची जोडी, विधान परिषदेत सासरे तर विधानसभेत जावई
- Anil Gote : ..म्हणून वडिलकीचा सल्ला देतो, मानला तर आपलाच फायदा! मुख्यमंत्री शिंदेंना माजी आमदारांचे पत्र
- Maharashtra Politics Timeline : सत्तानाट्याचा आज तेरावा दिवस, 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Assembly session : शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा, दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी